याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक १३/०४/२०२३ रोजी सायंकाळी चोपडा ग्रामीण पोलीसांकडून लासुर ते सत्रासेन रोडवर सत्रासेन घाटातील मुळ वळण रस्त्यावर नाकाबंदी सुरु असतांना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सत्रासेनकडून मारुती सुझुकी कंपनीची राखडी रंगाची स्विप्ट कार वाहन क्रमांक MH 01 BF 0708 ही वेगात येतांना सदर वाहनाचा पोलीसांना संशय आल्याने त्यांनी वाहनास थांबवून गाडीतील इसमांना खाली उतरविले व त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये एक हिरवट रंगाची काळे ठिपक्याच्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर वाहनात असलेले १)किरण कमलाकर शिंदे वय २४ वर्ष रा. लासलगाव ता.निफाड जि.नाशिक, २) टिनु उर्फ दशरथ रामचंद्र पवार वय ३५ वर्ष रा. पिंपळगाव बसवंत नगर, उंबरचखेड रोड, भावनगर, पारधीवाडा, ३) रामनाथ विश्वनाथ दाभाडे वय ३० वर्ष रा. पिंपळगाव बसवंत नगर उंबरचखेड रोड भाव नगर पारधीवाडा, ४) युवराज भगवान माळे वय २६ रा. पिंपळगाव बसवंत नगर उंबरचखेड रोड भाव नगर पारधीवाडा, व वाहन चालक ५) केशव बंडुनी बखरे वय ४६ वर्ष रा. पिंपळगाव बसवंत नगर उंबरचखेड रोड ता.निफाड जि.नाशिक अशांना वाहनासह ताब्यात घेवून पो.स्टे. ला आणण्यात आले. व त्यांच्यावर पो. स्टे. येथे सीसीटिएनएस. गु.र.नं. ००५०/२०२३ भादंवी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ तसेच मु.पो.अॕक्ट कलम ३७(१)(३) चे उलंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...