टिम लोकप्रवाह, दि. ३० एप्रिल चोपडा – तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शैक्षणिक वर्षे २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल, स्पर्धा व विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्य यानुसार वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपुजन व बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, संचालक भानुदास पाटील, पी. एच. महाजन, रमेश पाटील, महादू पाटील, सी. बी. निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. पी. चौधरी यांच्यासह पालक प्रतिनिधी म्हणून सीमा सुरक्षा दलातील व सध्या पश्चिम बंगाल येथे कार्यरत जवान समाधान पाटील व आयटीबीपी मध्ये अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत जवान नितीन पाटील व प्राचार्या जेनीफर साळुंके हे उपस्थित होते.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...