टिम लोकप्रवाह, ०१ मे, चोपडा – येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिरास विज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल दि. ३० एप्रिल रोजी नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे दिला जाणारा सन – २०२३ चा “राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्कार” जळगांव येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार इस्रोचे शास्त्रज्ञ सतीश सेतूमाधव यांच्या हस्ते शाळेला प्रदान करण्यात आला.
शतकोत्तर वाटचाल करणारी प्रताप विद्या मंदिर ही शाळा चोपडा तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्य करीत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या प्रचार व प्रसार करण्यामध्ये शाळेची भूमिका अत्यंत महत्वाची असून समाजातील अंधश्रद्धा व अज्ञान दूर करण्याचे प्रयत्न शाळेच्या माध्यमातून सदैव करण्यात येतात. शाळेमार्फत तालुक्यातील विद्यार्थीवर्गाकरीता प्रत्येक विज्ञान विषयाकरीता स्वतंत्र प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांसाठी मोफत आयआयटी फाउंडेशनचे वर्ग तसेच विज्ञान प्रदर्शन, लहान वयातच विज्ञाननिष्ठा रूजवण्यासाठीचे शाळेमार्फत केलें जाणारे प्रयत्न व शिक्षकांसाठी असलेले स्टेम फोरम आदी विविध कार्यक्रम शाळेमार्फत चालविले जातात. विज्ञानामुळे समाजात विवेक जिवंत होत असल्यामुळे मानवता समृद्ध होते. विज्ञानाच्या सेवेसाठी प्रताप विद्या मंदिराच्या माध्यमातून अनेक विज्ञान वारकरी घडवून समाजाची सेवा केली जात आहे या विविध गुणवत्तापूर्ण कार्यामुळे शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार प्राप्तीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजा मयूर, सचिव माधुरी मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेश जैन, मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी, उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे. एस. शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, पी. डी. पाटील, संस्थेने समन्वयक गोविंद गुजराथी, डी. टी. महजन आदींनी अभिनंदन व कौतुक केले.
Post Views: 445