टिम लोकप्रवाह, ०२ मे, चोपडा – आरोग्य क्षेत्रातील चांगल्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. सामान्य माणसांचा विचार करता “आपला दवाखाना” ही संकल्पना सर्व सामान्यांसाठी महत्वपूर्ण असून अशा या आरोग्यसेवेचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल असे प्रतिपादन आमदार लताताई सोनवणे यांनी केले. त्या दिनांक ०१ मे रोजी शहरातील सानेगुरुजी वसाहत येथील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” च्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला, दिपक चौधरी, अनिल बाविस्कर, प्रविण जैन, सुनिल बरडीया आदींची उपस्थिती होती.
आपला दवाखान्याचे उद्घाटन करतांना आमदार लताताई सोनवणे, डॉ. प्रदिप लासूरकर व इतर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासूरकर यांनी केले. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेबाबत विस्तृत माहिती देत शहरातील रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग प्रशासन तत्पर असल्याचे सांगितले. तसेच सदर दवाखान्याच्या माध्यमातून गरजूंना मोफत उपचार, मोफत रक्तचाचण्या व मोफत औषधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाठक यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी मानले. यावेळी डॉ. महेश लाडे, डॉ. मयुरेश जैस्वाल, तालुका पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर, सर्व अधिपरिचारक, सर्व आरोग्यसेविका, सर्व आशा स्वयंसेविका व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...