टिम लोकप्रवाह, चोपडा – तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या पोटाच्या दोन चिमुकल्या आणि निरागस बालकांना कुऱ्हाडीने वार करून ठार केले आहे. पत्नी भारती संजय पावरा याच्यावर चारित्र्याचा संशयाने सदर क्रूर प्रकार संजय पावरा याने केला आहे.
गौऱ्यापाडा तालुका चोपडा येथे पती संजय नानसिंग पावरा (वय 23 वर्षे) व पत्नी भारती संजय पावरा(वय 19 वर्षे) हे पाच वर्षाचा मुलगा डेव्हिड संजय पावरा आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल संजय पावरा यांच्यासह राहत होते. परंतु आरोपी संजय पावरा याला पत्नी भारती पावरा हिच्या चारित्र्याबाबत संशय आला आणि दि. १८ रोजी पती पत्नी दोघांमध्ये घरात भांडण सुरू झाले. त्यानंतर दररोज घरात भांडण सुरू होते. भारती पावरा ही चिमुकल्या मुलगी डिंपल पावरा सह भांडणाला कंटाळून मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या तिच्या आत्याच्या गावी रांजणगाव (मध्य प्रदेश) येथे निघून गेली. तिथे गेल्याचे समजल्यानंतर संजय नानसिंग पावरा याचे आई-वडीलही तिथे गेले आणि भारती पावरा हीस उलट सुलट बोलू लागले. हे भारती पावरा हिच्या माहेरील नातेवाईकांना माहिती पडले. नातेवाईक तिला तिचे माहेरी देवली येथे घेऊन गेले. देवली (मध्यप्रदेश) येथे माहेर असलेली भारती पावरा ही मुलगी डिंपल संजय पावरा(वय 3 वर्षे) गेली असल्याचे माहिती पडल्यानंतर आरोपी व पती संजय नानसिग पावरा हा मुलगा डेविड संजय पावरा (वय वर्ष 5) याला घेवून त्याची सासरवाडी असलेल्या देवली येथे दि. 22 रोजी गेला.
दिनांक 22 रोजीच त्याने जिथे पत्नी राहत होती त्याच्या आजूबाजूला कुऱ्हाडीचा व लोखंडी सळईचा शोध घेऊन ठेवला. दि. 23 रोजी सकाळी 8.00 वाजता पत्नी भारती सोबत भांडण केले. त्यात त्याने कुऱ्हाडीच्या एकेक घाव घालून दोन्ही मुलांचा जागीच निर्घृण खून केला. आणि त्यानंतर पत्नी भारती पावरा हीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने पाच ते सहा वार केले. भारती पावरा हिने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले आणि सदर कृत्य पाहून त्यांनी त्या आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने लोखंडी सळईनेही भारतीला मारहाण केली होती. सदर घटना मध्य प्रदेशमधील वरला पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याने वरला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल असून आरोपी तिथे पोलिसांच्या ताब्यात आहे.
तर कुऱ्हाडीच्या वार मध्ये पत्नी भारती पावरा तिच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्या मेंदूवर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया झाली असून त्याठिकाणी ती मृत्यूशी झुंज देत आहे. स्वतःच्या पोटच्या दोन निरागस मुलांचा निर्घृण खून केल्याने आरोपी संजय नानासिंग पावरा याच्यात असलेल्या कृरतेचा निषेध केला जात आहे. जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...