टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 05 आॕगस्ट – येथील वर्धा साहित्य कला मंच द्वारा जगप्रसिद्ध गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दिनांक ६ आॕगस्ट रोजी दादाजी धुनिवाले सभागृहात फिल्मी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक अमित लांडगे यांचें हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या जयश्री कोटगिरवार, समाजसेविका मंगला गोटाफोटे, सुवर्णकार अमोल ढोमणे, अॕड. वैभव वैद्य, डॉ. आसमवार, धुनिवाले ट्रस्टचे अध्यक्ष हरिष व्यास, उपाध्यक्ष अनिल रोडे, सचिव प्रमोद नेरकर, डॉ. अजय वाणे आदिंची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विजेत्यांस प्रथम पुरस्कार १७००१ रू. स्व. गायत्रीदेवी अग्रवाल स्मृती पुरस्कार मोहनबाबु अग्रवाल यांचेकडून देण्यात येणार आहे, व्दितीय पुरस्कार ११००१ रुपये समाजसेवक सुनील बुरांडे यांच्या आई स्व. सरस्वतीबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, तृतीय पुरस्कार स्व. अॕड. राजेंद्र खरे यांचे स्मुतीप्रित्यर्थ ७००१ रुपये अॕड. अरूणा खरे यांच्याकडून, चतुर्थ पुरस्कार ५००१ रूपये स्व, सुनील कोटगिरवार याचे स्मृतीप्रित्यर्थ प्राचार्या जयश्री कोटगिरवार तर पंचम पुरस्कार श्री चिंतामणी आॕटो डिलचे गिरीशजी सावळकर यांचेकडून देण्यात येणार आहे. तसेच २००१ रूपयांचे आठ प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण सोहळ्यास समाजसेवक मोहनबाबु अग्रवाल देवळी, माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते, इंडियन आॕईल भोपालचे महाव्यवस्थापक योगीराज गोटाफोटे, आदमजी अँड सन्सचे आसिफ ईब्राहिम, संघचालक वर्धाचे डॉ. प्रसाद देशमुख, एटिडी ज्वेलर्सचे सौरभ ढोमणे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ, जंयत मकरंदे, मैत्री सामाजिक संस्थेचे सचिव प्रकाश घुशे, लाॅयन्स क्लबचे अनिल नरेडी यांचे शुभहस्ते होणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये नवोदित गायक व रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन साहित्य शोधक मंचाचे अध्यक्ष सूनिल बुरांडे, सचिव प्रभाकर उगेमुगे व कार्यवाहक दिलीप मेने यांनी केले आहे.