Wednesday, April 29, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल सप्ताहांतर्गत युवा संवाद कार्यक्रम संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2023
in शिक्षण, शासकीय
0
सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल सप्ताहांतर्गत युवा संवाद कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ३ आॕगस्ट – तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महसूल व वन विभाग अंतर्गत १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत आयोजीत युवा संवाद कार्यक्रमाचा प्रारंभ  झाला. याप्रसंगी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बांबळे, आर. बी. माळी, संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, भानुदास पाटील, रमेश पाटील आदिंची  उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, तलाठी व ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती देतांना नायब तहसीलदार सचिन बांबळे
या सप्ताहअंतर्गत इ. ९वी ते १२वीतील विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये ई-पीक पाहणी अॕप, नवीन मतदार नोंदणी अर्ज स्वीकारणे अशा विविध शासकीय योजनांचा समावेश होता. याप्रसंगी जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. परिसरातील कृषीमित्रांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना व विविध प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, त्याचा प्रसार प्रचार आपल्या घरी तसेच परिसरात करावा असे प्रांताधिकारी बंगाळे यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. बिऱ्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन हातेड मंडळचे तलाठी आशिष निचित यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 347
Previous Post

विवेकानंद विद्यालयात ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एकदिवसीय गायन शिबिर संपन्न

Next Post

उद्या रविवारी साहित्य कला शोधक मंचातर्फे स्मार्ट सिंगर गायन स्पर्धेचे आयोजन

Next Post
उद्या रविवारी साहित्य कला शोधक मंचातर्फे स्मार्ट सिंगर गायन स्पर्धेचे आयोजन

उद्या रविवारी साहित्य कला शोधक मंचातर्फे स्मार्ट सिंगर गायन स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us