टिम लोकप्रवाह, दि. 10 वर्धा – शहरातील दादाजी धुनिवाले सभागृहात रविवारी साहित्य कला शोधक मंच आयोजीत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजकांकडून सुबोध मोहिते यांना एखादे गीत गाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहिते यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकप्रिय ,हम तेरे शहर में आये है, मुसाफिर की तरह” हे अजरामर गीत गावुन रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक मोहनबाबु अग्रवाल, साहित्य कला शोधक मंचाचे अध्यक्ष सूनिल बूरांडे, इंडियन आॕईल भोपालचे महाव्यवस्थापक योगीराज गोटाफोटे, प्रा, जयश्री कोटगिरवार, संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, अमोल ढोमणे, डॉ. जंयत मकरंदे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अमित गांवडे, अॕड. गजानन वैद्य, अनिल नरेडी, हरिष व्यास, पंकज घुशे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपले विचार व्यक्त करतांना गीत संगित हे परमेश्वराशी प्रत्यक्ष जोडण्याचे साधन आहे, असे जेष्ठ समाजसेवक मोहनबाबु अग्रवाल म्हणाले, गायत्रीदेवी अग्रवाल स्मृती पुरस्कार १७००१ चा मानकरी चंद्रपूर येथील प्रशांत शामकुवर, स्व. सरस्वतीबाई बुरांडे स्मृती द्वितीय पुरस्कार ११००१ चा मानकरी मदनी (वर्धा) येथील गजानन वानखेडे, स्व, अॕड. राजेंद्र खरे स्मृती तृतीय पुरस्कार ७००१ रु. चा मानकरी यवतमाळ येथील अनुराग गुजर तर स्व, सुनील कोटगिरवार स्मृती ५००१चतुर्थ पुरस्काराची मानकरी नागपूर येथील लाजरी भुरे ठरली. याशिवाय २००१ रुपयाचे आठ प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. सदर स्पर्धेचे यंदा ३७ वे वर्ष असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण विदर्भातून नवोदित गायक कलाकार सहभागी होत असतात. स्व. मोहम्मद रफी यांचे एकापेक्षा एक लोकप्रिय गीत सादर करीत असतात.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पट्टेवार यांनी तर अंतिम फेरीचे नागपूर येथील एम. ए. रज्जाक यांनी केले. आभार प्रशांत चवडे यांनी मानले. या स्पर्धेला परिक्षक म्हणून शेख मोबिन वाशिम, विणा उकंडे नागपूर, सुरेंद्र दप्तरी वर्धा, केतकी कुळकर्णी, धनंजय भट व सुधीर गिऱ्हे हे होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सूनिल बूरांडे, प्रभाकर उगेमुगे, हरिष कनोजे, दिलीप मेने, सुनील काळे, चंद्रजित टागोर, प्रशांत हटवार, नितीन पटवर्धन, आनंद मून, अमर काळे, सुर्यकांत शेगावकर, प्रशांत चव्हाण, विकास फटिंगे, गिरीश सावळकर, गजानन निनावे, प्रल्हाद मानकर, अतुल पिसे, मोहन शेवळे, डॉ. विजय लोखंडे आदिंनी सहकार्य केले.