Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

तहसीलदार व पोलिस निरिक्षक यांना चोपडा शहर व तालुका पत्रकारांकडून  निवेदनाद्वारे मागणी 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 11, 2023
in चोपडा, जळगांळ जिल्हा
0
पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ११ : शहर व तालुका पत्रकार बांधवांतर्फे पाचोरा येथील पत्रकारावर  भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना देण्यात आले. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना निवेदन देतांना सर्व पत्रकार बांधव…
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना काही दिवसाअगोदर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून मारहाण करणे बाबत धमकी दिली होती. त्यानंतर दिनांक ०९/०८/ २०२३ रोजी पत्रकार संदीप महाजन वृत्तांकनावरून घरी परत येत असतांना त्यांच्यावर तीन ते चार इसमांनी भ्याड हल्ला करीत त्यांना जबर जखमी केले. सदर भ्याड हल्ला हा आमदार किशोर पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत जाहीर निषेध केला. व भ्याड हल्ला करणारे तसेच त्यामागे असणाऱ्या मास्टरमाइंडवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच पत्रकार संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्तात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देतांना सर्व पत्रकार बांधव..
यावेळी शाम जाधव, संजय सोनवणे, अनिल पालीवाल, मिलिंद सोनवणे, प्रविण पाटील, पंकज पाटील, सुनिल पाटील, श्रीकांत नेवे, चंद्रकांत पाटील, उमेश नगराळे, लतीष जैन, संजय बारी, तुषार सूर्यवंशी, सचिन जैस्वाल, विश्वास वाडे, महेश शिरसाठ, हेमकांत गायकवाड, संदिप ओली, मन्सूर तडवी, शुभम माळी, नंदलाल मराठे, मिलिंद वाणी, विनायक पाटील, समाधान कोळी, आत्माराम पाटील, जितेंद्र शिंपी, जगन्नाथ बाविस्कर, शुभम साळूंके आदींंसह इतय पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 897
Previous Post

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी साहित्य कला शोधक मंचाच्या व्यासपीठावर गीत गावुन जिंकली रसिकांची मने 

Next Post

मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने दिले निवेदन

Next Post
मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने दिले निवेदन

मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us