टीम लोकप्रवाह, चोपडा दि. १८ – स्वातंत्र्यदिनानिमित्त तालुक्यातील गणपुर गावातील विकास माध्यमिक विद्यालयात श्रीदत्तप्रभु ऍग्रो (शुगर) इंडस्ट्री लि.व पाटील उद्योग समुह पुणे, चेअरमन उद्योजक दिपक काशिनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी इयत्ता १० वी त प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस व मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
शाळेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने दीपक पाटील यांना विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थांच्य्या जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या कार्यास दीपक पाटील यांनी रोख स्वरूपात रु. १,११,००० ची मदत केली. या सामाजिक कार्यासाठी केलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आणि पुण्यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरात राहून आपल्या जन्मभूमीबद्दल जे प्रेम आहे हे बघून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी दिपक पाटील सांगितले की, गावाच्या सर्वांगीण व सामाजिक विकासासाठी आमचा उद्योग समुह कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही दिली. कार्यक्रमास गावातील सरपंच, जि.प.सदस्य, वि.का. सोसायटीचे अध्यक्ष, दुध संघ चे अध्यक्ष, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ हजर होते.