Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त  राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा रोटरी क्लब व नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 17, 2023
in सांस्कृतिक, सामाजिक
0
चोपड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त  राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १७ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा संपूर्ण देशभर जल्लोषात साजरा होत असतांना रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायनाच्या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे यंदाही  आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख पंकज पाटील, सहप्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे व स्पर्धा परिक्षक शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी, विजय पालिवाल, प्रीती गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती.
             यामध्ये प्रताप विद्या मंदिराने दोन गटात प्रथम व एका गटात कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून आपला झेंडा रोवला तर मोठ्या गटात महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयानी आपला झेंडा रोवला. सदर स्पर्धेमध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल, पंकज विद्यालय, महिला मंडळ माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विवेकानंद माध्य. विद्यालय आदिंनी सहभाग घेत यश मिळविले. यामध्ये जवळपास २० संघानी सहभाग घेतला होता.
          सर्व विजेत्या संघाना उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, चोपडा रोटरी पदाधिकारी,  स्पर्धा परिक्षक व रोटे. व्ही . एस . पाटील, विलास पी. पाटील, चंद्रशेखर साखरे, विपुल छाजेड, प्रदीप पाटील आदिंच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सदर स्पर्धेचे प्रास्ताविक रोटे. चेतन टाटिया यांनी तर सूत्रसंचालन रोटे. राधेश्याम पाटील व प्रीती सरवैय्या पाटील यांनी केले.
Post Views: 433
Previous Post

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती

Next Post

दत्तप्रभू ऍग्रोचे संचालक दिपक पाटील यांचा चिमुकल्यांसाठी मदतीचा हात

Next Post
दत्तप्रभू ऍग्रोचे संचालक दिपक पाटील यांचा चिमुकल्यांसाठी मदतीचा हात

दत्तप्रभू ऍग्रोचे संचालक दिपक पाटील यांचा चिमुकल्यांसाठी मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us