Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

१५ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 25, 2023
in क्राईम, ठळक बातमी, ब्रेकींग न्युज
0
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २५ – तब्बल पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तीन पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्तावर त्यांची मोटार सायकल अडवून थांबवले होते. तुमच्याजवळ गांजा आहे, असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे त्यांना सांगितले. व तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची करायची आहे. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते.

शिवाजी ढगु बाविस्कर सहा.फौजदार

तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटे चार वाजेच्या सुमारास तीस हजार रुपये घेण्यात आले, मात्र मोटरसायकल ठेवून घेतली. मोटार सायकल सोडवायची असल्यास राहीलेले विस हजार रुपये आम्हास द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर दि. 24 ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे गांजाची केस न करण्यासह मोटार सायकल सोडवण्यासाठी विस हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती पंधरा हजार रुपये पंचासमक्ष सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यांनी घेतले. त्याच वेळी एसीबी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांवचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, पोना. बाळु मराठे, पोकॉ. राकेश दुसाने आदिंनी केली. त्यांना पोलीस निरिक्षक एन. एन. जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकाँ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना. किशोर महाजन, सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदिप पोळ, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदिंचे सहकार्य होते.

Post Views: 2,403
Previous Post

दत्तप्रभू ऍग्रोचे संचालक दिपक पाटील यांचा चिमुकल्यांसाठी मदतीचा हात

Next Post

चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार !!; लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

Next Post
चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार !!; लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार !!; लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us