टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक १५ – मराठी भाषा समृद्ध व संपन्न करण्याचे कार्य जोमाने करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या चोपडा शाखेतर्फे दि. १८ ते २० डिसेंबर या कालावधीत ‘प्रियजन स्मृती व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे.
येथील पंकज नगर मधील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात दररोज रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. १८, सोमवार रोजी प्रेमाचा जांगडगुत्ता कवितेचे कवी नारायण पुरी (छ. संभाजी नगर) हे ‘कविता जनामनाची’ या विषयावर गुंफणार आहे. तर दि. १९ मंगळवार रोजी धुळे येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. प्रकाश पाठक हे ‘श्रीराम – आदर्श पुरुषोत्तम’ या विषयावर व दिनांक २० बुधवार रोजी सुप्रसिद्ध वक्ते प्रा. आर. एन. महाजन (धरणगाव) हे ‘आजच्या संदर्भात स्वामी विवेकानंद’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित या व्याख्यानमालेचे प्रायोजकत्व डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. तृप्ती व डॉ. राहुल पाटील, भूपेंद्र पाटील, प्रा. संदीप पाटील, अविष्कार चव्हाण, ॲड. डी. पी. पाटील यांनी स्वीकारले आहे.
या व्याख्यानमालेचे हे चौथे वर्ष असून चोपडेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील व कार्यकारी मंडळ तसेच विश्वस्त मंडळांने केले आहे.