Wednesday, April 29, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अमळनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 13, 2023
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ – शहरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर संगनमताने अत्याचार केल्याप्रकरणी न्यायधिश पी. आर. चौधरी (जिल्हा न्यायधिश अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर) यांनी दोघा आरोपींना प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा. मिल्लत नगर चोपडा) आणि शेख मुजक्कीर हमीद पिंजारी (रा. मण्यारअळी चोपडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 157/2019 भा. दं. वि. कलम 363, 366, 34, पोस्को कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास पथक

चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या सुमारे पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी गुलाम रसुल शेख मस्तान मोमीन याने प्रेमसंबंध निर्माण केले होते. अल्पवयीन पिडीत मुलगी शाळेत जात असतांना 6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास दोघे आरोपी तिला चोपडा शहरातून अमळनेर येथे फिरायला घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी तिच्यासोबत संगनमताने कुकर्म करीत अत्याचार केले.

आरोपी

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहायक फौजदार सुनिल पाटील यांनी केला. या गुन्ह्याचा सर्वांगिण तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी पुर्ण केला. त्यांना हेकॉ. प्रदिप राजपूत यांचे सहकार्य लाभले. सहायक सरकारी अभियोक्ता आर. बी. चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केस वॉच पो.कॉ. नितीन कापडणे यांनी याकामी मदत केली.

 

Post Views: 1,891
Previous Post

पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

चोपड्यात सोमवारपासून प्रियजन स्मृती व्याख्यानमाला

Next Post
चोपड्यात सोमवारपासून प्रियजन स्मृती व्याख्यानमाला

चोपड्यात सोमवारपासून प्रियजन स्मृती व्याख्यानमाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us