टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २२ : तालुक्यातील पिपरी मेघे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कॉलनी परिसरात प्रभु श्रीराम यांच्या अयोध्या येथे आयोजीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिक्षक कॉलनी येथे आनंदाचे वातावरण होते. त्याचे औचित्य प्रभु श्रीरामाची मनोभावे पुजा करुन आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे डॉल्बी साऊंड वाजवून जल्लोष करण्यात आला तसेच लंगर व महाप्रसादाचे आयोजनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी प्रभु श्रीरामाचे रुप साकारलेला बालक चि. शिवरुद्र इंगोले हा आकर्षणाचे केंद्र बनला होता. परिसरातील नागरिकांची याप्रसंगी आवर्जुन उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी जि.प. सदस्य संजय शिंदे, सुमित ठवळे, माँटी यादलवार, सागर दुर्गे, खोडके, भूषण कडू, रमेश खेडेकर, कलोडे, तडस, माहुरे, पप्पु इंगोले, विराज शिंदे, काळस्कर, सागर झाडे, निलेश दाते, सूरज तुरंकार, प्रदीप डंभारे, विशाल चौधरी, अमोल ठेकाळे आदिंसह परिसरातील इतर नागरिकांची उपस्थिती होती.