टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30: तालुक्यातील वायगावं (निपाणी) येथे दोन दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्पोटिंग क्लब, वायगावं निपाणी व युवक काँग्रेस वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन २८ जानेवारी रोजी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. यावेळी त्यांनी बोरगाव आंबोडा आणि मीरापूर या दोन संघादरम्यान नाणेफेक करून सदर सामनाल्या सुरुवात करून दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिप सदस्य चंद्रकांत ठक्कर, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमित गावंडे, उपसभापती पांडुरंग देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य बाबाराव निवलं, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनील तळवेकर, माजी उपसरपंच मुनाफ शेख, वर्धा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल उघडे, वर्धा तालुका युवक काँग्रेस सचिव राहुल सुरकार आदिंसह गावातील व परिसरातील कबड्डी प्रेमी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.