Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

खत नियंत्रण आदेश उल्लंघनाप्रकरणी चोपड्यातील दोन कृषी केंद्रांचा परवाना निलंबीत…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 30, 2022
in शेती विषयक, महाराष्ट्र
0
खत नियंत्रण आदेश उल्लंघनाप्रकरणी चोपड्यातील दोन कृषी केंद्रांचा परवाना निलंबीत…!

लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जून – शहरातील स्टेट बँकेजवळील मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी व हरेश्वर कॉलनी स्थित मे. राजप्रभा फर्टिलायझर या दोन कृषी केंद्रांच्या तपासणी दरम्यान त्यांनी खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने जळगांव कृषी विभागामार्फत दोन्ही कृषी केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आले. 

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, जळगांव अरुण तायडे यांनी दि. १८/०६/२०२२ रोजी मे. राजप्रभा फर्टिलायझर व मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी या विक्री केंद्रांची तपासणी केली असता दुकानात विक्रीस ठेवलेला सर्व उत्पादनांचा परवान्यात उगमप्रमाण पत्र समाविष्ठ नसणे, साठा रजिस्टर मध्ये नमूद केल्याप्रमाणे साठा न जुळणे, रासायनिक खत विक्रीचा मासिक अहवाल नोंदणी अधिकारी यांना सादर न करणे, मुदतीत खुलासा सादर न करणे तसेच रासायनिक खतांची कमाल विक्री दरापेक्षा जादा दराने विक्री करतांना आढळुन आल्याने जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरुण तायडे यांनी तसा प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयास सादर केला.

https://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4

त्यानंतर सदर कृषी केंद्रधारकांनी खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळुन आल्याने दिनांक २४/०६/२०२२ रोजी सुनावणी आयोजीत करण्यात आली. सुनावणीच्या वेळी मे. राजप्रभा फर्टिलायझर या विक्री केंद्राचे संचालक दिपक युवराज जयस्वाल , मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी चे संचालक सारंग रमेश अग्रवाल, जळगांव कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मोहिम अधिकारी विजय पवार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे आदिंची उपस्थिती होती.

सुनावणी वेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तपासणी समितीने प्रस्तुत प्रकरणाबाबत चर्चा केली असता सदर विक्रेता यांनी खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ३(३), ४, ५, २८ (१) (ए) व ३५ (१) (ए) (बी) चे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्याने मे. राजप्रभा फर्टिलायझर व मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी यांचा खत विक्री परवाना सात दिवसांकरीता म्हणजेच दि. २७/०६/२०२२ ते दि. ०३/०७/२०२२ पर्यंत निलंबीत करण्याचे आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी कडू ठाकुर यांनी केला आहे. तथापि या दोन्ही विक्री केंद्रांना निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारे खतांची साठवणुक तसेच विक्री न करण्याचे आदेश  देण्यात आले आहे.

Post Views: 765
Previous Post

विवेक फणसळकर मुंबईचे नविन पोलीस आयुक्त

Next Post

चोपडा शहरात भरदिवसां दोन धाडसी घरफोड्या; जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

Next Post
चोपडा शहरात भरदिवसां दोन धाडसी घरफोड्या; जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

चोपडा शहरात भरदिवसां दोन धाडसी घरफोड्या; जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us