Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

मुलगा गंभीर जखमी; संशयित आरोपी पिता पोलिसांच्या ताब्यात

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
in क्राईम, चोपडा, जळगांळ जिल्हा
0
वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. झोपेत असलेल्या स्वतःच्या दोन मुलांवर पित्याने धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचा भाऊ रामू सुभाष भिलाला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष गोपाल भिलाला (वय ५०) हा वडती येथील पाण्याच्या टाकीजवळील झोपडीत राहत होता. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याची दोन्ही मुले झोपेत असताना त्याने त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात मीरा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर आरोपी जंगलात पसार

घटना घडल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आणि जवळील जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कडारे व त्यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी जंगल परिसरात शोध घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पोलिस वाहनातून पुढील कारवाईसाठी नेण्यात आले. या कारवाईदरम्यानचे फोटोही समोर आले आहेत.

आरोपीला ताब्यात घेताना पोलीस पथक

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत.

 

हल्ल्यामागील नेमके कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी दारूच्या आहारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याने स्वतःच्या मुलांवर एवढा गंभीर हल्ला का केला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मद्यधुंद अवस्थेतील राग किंवा अन्य काही कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्याची चर्चा परिसरात आहे. या बाबीचीही पोलीस पडताळणी करीत आहेत.

पोलिस वाहनातून आरोपीला घेऊन जाताना

खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी सौ. मायाबाई सुभाष भिलाला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) (खून) व १०९(१) (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.

घटनास्थळाची पाहणी करतांना पोलिस अधिकारी व कर्मचारी

या घटनेने वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात खळबळ उडाली असून, पित्याकडून स्वतःच्या मुलांवर झालेल्या या कथित हल्ल्याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कडारे करीत आहेत.

Post Views: 423
Previous Post

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

Next Post

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Next Post
डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us