सचिन ओली, वर्धा दि. 16 : लगतच्या पिपरी मेघे येथील त्रिमूर्ती नगर येथील निलेश वांढरे या युवकाच्या खुन प्रकरणातील आरोपी सचिन अशोक पाराशर वय. 38 वर्ष रा. टिळक चौक, हिंगणघाट जि. वर्धा यास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून त्याचे मामा संतोष मिश्रा रा.धामोरी पो. स्टे. खोलापूर जि. अमरावती येथून मोठ्या शिताफिने 24 तासाच्या आत रामनगर पोलीस स्थानकाच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आदींच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, सपोनी. राजेश जोशी, पोलिस हवालदार गिरीश चंदनखेडे, पोना. ऋषिकेश घंगारे, पोकॉ. चेतन पापळे, अमोल गीते यांनी केली.