Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
in चोपडा, शैक्षणिक
0
डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयातील पीजी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स व रिसर्च सेंटरच्या मार्फत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शहरातील बँक ऑफ बडोदा मॅनेजर मनीष गौरखेडे व सहाय्यक मॅनेजर रोहित पाटील यांचे सरकारी बँकांमधील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन .सोनवणे, तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एन .बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी .सूर्यवंशी, विभाग प्रमुख डॉ. सी .आर. देवरे हे उपस्थित होते.
   कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी व प्रमुख मार्गदर्शक मनीष गौरखेडे यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन करत असताना आयबीपीएस परीक्षा व वाणिज्यचे विद्यार्थी यांचा खूपच जवळचा संबंध असतो असे प्रतिपादन केले. बँकिंग करिअरबद्दल व बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या बाबींवर विशेष व प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी शैक्षणिक कर्ज सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना याबद्दल देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक मॅनेजर रोहित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी बँकिंगच्या परीक्षेकडे पाहताना एक महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे सांगितले. तसेच वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना बँकिंग करिअर क्षेत्रामध्ये खूपच जास्त वाव आहे. असे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आर. एन .बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखून मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले पाहिजे. तसेच वाणिज्यला आज अतिशय चांगल्या प्रकारची मागणी सर्व समाज माध्यमांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसमोर नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलत असताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर .देवरे यांनी वाणिज्य मंडळ उद्घाटन व वाणिज्य मंडळ स्थापना यामागे असलेली उद्दिष्टे व मंडळ अंतर्गत घेण्यात येणारे विविध कार्यक्रम हे कशा प्रकारचे असतात व काय हेतू असतो याबद्दल सविस्तर मांडणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. प्रवीण जैन यांनी केले असून आभार एच. सी. देवरे यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख व्हि.पी हौसे, सी.पी .बाविस्कर, भाविका गुजराथी, योगिनी पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 426
Previous Post

शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 

Next Post

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

Next Post
नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us