लोकप्रवाह, वर्धा दि. १० आॕगस्ट – येथील महादेवपुरा स्थित हजरत चांदशाहवली बाबा दर्गा येथे मोहरर्म निमित्त वर्धा शहर आम आदमी पार्टी व जिल्हा युवा आघाडीच्यावतीने शरबत वाटप करण्यात आले. सदर उपक्रम आम आदमी पार्टीचे वर्धा जिल्हा संयोजक प्रमोद भोमले यांच्या मार्गदर्शनाखाली व वर्धा शहर संयोजक श्रीकांत ब. दोड यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण यावेळी बघायला मिळाले. याप्रसंगी अनेक माता, भगिनी व बांधवांनी शरबतचा आस्वाद घेतला. सामाजिक ऐक्याची जाण ठेवून करण्यात आलेल्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक होत आहे.
यावेळी आम आदमी पार्टी वर्धा जिल्हा संयोजक प्रमोद भोमले, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेकरीता वर्धा शहर संयोजक श्रीकांत ब. दोड, वर्धा शहर संघटनमंत्री संजय आचार्य, शहर सचिव कुणाल लोणारे, शहर सहसंघटन मंत्री अतुल तिडके, सोशल मीडियाप्रमुख आकाश सुखदेवे, वर्धा जिल्हा युवा आघाडी सहसंयोजक खालिद खान, युवा आघाडी जिल्हा सचिव संदीप डंभारे, प्रभाग क्रमांक 1 संयोजक मधुकर वावरकर, प्रभाग 9 संयोजक नागेश तांगडे, प्रभाग 6 संयोजक दत्तु भोंबे, प्रभाग क्रमांक 3 संयोजक प्रशांत आंबटकर, अमोल पाटील आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.