लोकप्रवाह, चोपडा दि. १४ आॕगस्ट – सर्व सजीवांची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा वाटा आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे , तर ते आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे.
परंतु समाजात वृक्ष व निसर्गातील जैविक व अजैविक घटकांच्या अस्तित्वाबद्दलची अनास्था , सातपुडा पर्वतराजी- तिल अवैध वृक्षतोड , वणवे , काही खोटे वनदावे , वन विभागाकडील अपुरे मनुष्यबळ , अवैध अतिक्रमण , पुष्पाचा प्रहार , लहरी मान्सून इ. कारणामुळे सातपुडा विव्हळतोय तर शहरात व लगतच्या महामार्गांवरील वृक्षतोडीबाबत स्थानिक प्रशासनाची निष्काळजी व निष्क्रिय भुमिका, लावलेल्या वृक्षांबद्दल दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे शहर व उत्तरेकडील निसर्ग अस्तित्वासाठी झुंजतो आहे.
अशा परिस्थितीती येथील स्वयंअर्थसहाय्यित सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील निसर्ग संवर्धनासाठी सातपुड्यात कक्ष क्र. 236 येथे जुलै-ऑगस्ट महिन्यात वनविभाग चोपडा द्वारा आयोजित वृक्षारोपण व महाबीज रोपणात श्रमदान करून सहभाग नोंदवला. वनविभागातर्फे विविध क्षेत्रात हजारोच्या संख्येने वन रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. या सेवाकार्यात सातपुडा समूहातर्फे 351 पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले. तर स्वत: संकलित केलेले पिवळा व केसरी पळस, आंबा, चिंच, बेल, कवठ, जांभूळ, अमलतास, लाल काटेसावर या वृक्षांचे 501 हून अधिक बीजरोपण पडत्या पावसात करण्यात आले. वृक्षांशिवाय मानव व सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. तसेच निसर्गऋण व्यक्त करण्यासाठी रक्षा बंधनाच्या दिनी बेल, औदुंबर, शिसू इ. वृक्षांना राखी बांधून वृक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या निसर्ग सेवा कार्यात सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे हेमराज पाटील, अश्विनी पाटील, अश्फाक पिंजारी, सुनील पाटील, अनुसया जोशी, आर्यदीप पाटील, सोनल नेवे, कृष्णप्रिया पाटील व स्वप्नील नेवे यांनी परिश्रम घेतले. यासाठी सातपुडा समूहाला सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी पी व्ही हाडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. सोनवणे, वनपाल बोर अजंटी ए.आर.धात्रक, वनरक्षक नोकेश बारेला यांनी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केले.
अतिशय योग्य आणि उत्कृष्ट अशा समाजोपयोगी कार्याबद्दल सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेच्या संपूर्ण टिम ला मनापासून SALUTE
– संपादक