लोकप्रवाह, चोपडा दि. २८ आॕगस्ट – येथील तालुका व्यापारी महामंडळ, रोटरी क्लब, जिल्हा उद्योग केंद्र व प्रचिती मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील याज्ञवल्क्य मंडळ सभागृह येथे दि. २८ आॕगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य तात्काळ कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, प्रविण गुजराथी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शामसिंग परदेशी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, आयोजक जळगांव येथील सीए पंकज दारा, रोटरी क्लब प्रेसिडेंट रूपेश पाटील, नितिन अहिरराव आदिंसह इतरांची उपस्थिती होती.
सदर मेळाव्याला सुमारे ३५ बँका सहभागी झाल्या होत्या. जवळपास दोनशे लोकांनी नवीन कर्ज मागणीसाठी अर्ज केला होता. यावेळी आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान बँकांमार्फत करण्यात आले. याप्रसंगी सुमारे १४ कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आलेले असून ११ कोटीचे कर्ज हे प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले. असे एकूण २५ कोटीचे कर्ज आजच्या मेळाव्यातून लोकांना दिले जाणार आहे तसेच उर्वरित बाकी लोकांची कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना कर्ज देणार असल्याचे सांगण्यात आले. या भव्य कर्ज मेळावा आयोजनाबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला व अनेक बँका एकाच छताखली भेटल्याने समाधान व्यक्त केले.
सदर कर्ज मेळावा यशस्वीतेकरीता उपक्रम प्रमुख संजय कानडे, सनी सचदेव, राजस जैन, सिद्धार्थ पालीवाल, मनोज कोष्टी, चेतन टाटिया, प्रफुल्ल स्वामी, प्रफुल्ल पाटील, नोमान काजी, संजय शर्मा, रोटरीचे सचिव गौरव महाले, मनोज पाटील, अनिल जोशी (सचिव यदन्यवल्क्य मंडळ) तसेच व्यापारी महामंडळाचे संजय श्रावगी (कार्याध्यक्ष) सुनील बरडीया(उपाद्यक्ष), श्याम सोनार (उपाध्यक्ष), दीपक राखेचा(उपाध्यक्ष), राजेन्द्र जैन (सचिव), नरेंद्र तोतला(सचिव) व सर्व व्यापारी महामंडळ पदधिकारी यांनी परिश्रम घेतले. जळगांव येथील पंकज दारा व त्यांच्या टीमचे यावेळी सहकार्य लाभले.
Post Views: 349