Saturday, September 19, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2022
in खेळ, शिक्षण
0
चोपडा महाविद्यालयात ‘मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न!!
लोकप्रवाह, चोपडा दि.30 :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष’ व ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता ‘भव्य मॅरेथॉनचे’ आयोजन करण्यात आलेले होते. हि मॅरेथॉन पुरुष मोठा गट, मुले लहान गट व महिला मोठा गट, मुली लहान गट अशा चार गटात आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनचे उदघाटन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व  सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ.आनंद पाटील, मिना सोमानी, चंदा पाटील, अशोक साळुंखे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी,  उपप्राचार्य प्रा.एन.एस. कोल्हे,  उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महात्मा गांधी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.सोनवणे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ, क्रीडा संचालिका के.एस.क्षीरसागर, लेप्टनंट डॉ.बी.एम.सपकाळ व क्रीडा संचालक अमोल पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी चंदाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘आपल्या आयुष्यातील काही वेळ योग, व्यायामासाठी व खेळासाठी द्यायला हवा. त्यामुळे शरीर निरोगी राहायला मदत होते. प्रसिद्ध वैद्यक डॉ.चंद्रकांत बारेला मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘ज्यांचे आरोग्य तंदुरुस्त असते त्यांना कोणताही आजार होत नाही. नियमित व्यायाम, योगा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणूनच जीवनातील काही क्षण व्यायामासाठी द्यावा. आयुष्यात धावले पाहिजे त्याशिवाय जगातील कोणतीही स्पर्धा जिंकता येत नाही.’
   अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘सर्वांनी रोज चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे त्याच्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ उत्तम राहते.
   या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले तर आभार लेप्टनंट डॉ.बी.एम.सपकाळ  यांनी मानले.
      या मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी पोलिस उपअधीक्षक कृषिकेश रावले, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी संचालक प्रा. डी. बी. देशमुख, अभियंता संतोष बाविस्कर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, अशोक साळुंखे,  उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य श्री. एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, महात्मा गांधी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.सोनवणे, रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
    या मॅरेथॉनमध्ये ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.  या मॅरेथॉनचे प्रायोजक म्हणून खानदेश स्पोर्ट्स, जळगाव येथील संजय जोशी यांचे सहकार्य लाभले. या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या  ७५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टी-शर्टचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मॅरेथॉनमधील विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या मॅरेथॉन मध्ये पुरुष मोठ्या गटातून दिपक पाटील – प्रथम क्रमांक, सचिन कोळी – द्वितीय क्रमांक, सागर धनगर – तृतीय क्रमांक व भूषण बाविस्कर – उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके प्राप्त केली. महिला मोठया गटातून पिंकी बारेला – प्रथम क्रमांक, सृष्टी सोनार – द्वितीय क्रमांक, पल्लवी कोळी – तृतीय क्रमांक व सोनाली कोळी – उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके प्राप्त केली. तसेच मुलांच्या लहान गटातून दिव्येश संतोष पाटील – प्रथम क्रमांक, रुपेश विजय कोळी – द्वितीय क्रमांक व कल्पेश जिजाबराव बागुले – तृतीय क्रमांक तसेच मुलींच्या लहान गटातून नंदिनी लीलाधर पाटील – प्रथम क्रमांक, पूनम हिरालाल चौधरी – द्वितीय क्रमांक व ईश्वरी चंद्रकांत करंदीकर – तृतीय क्रमांक या स्पर्धकांनी पारितोषिके मिळविली.
    यावेळी पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘आजच्या तरुणांनी आपल्या ध्येय पूर्तीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशाचे सुजाण नागरिक बनण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील असायला हवे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी केले तर आभार क्रीडा संचालिका के.एस.क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, क्रीडा विभाग, सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, स्पर्धक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 453
Previous Post

भव्य कर्ज मेळाव्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद; जवळपास २५ कोटी रुपये कर्ज झाले मंजूर!! चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

Next Post

महिला सक्षमीकरणाचा पाया शालेय जीवनापासून घडवणे आवश्यक; सी.बी.निकुंभ हायस्कुल घोडगाव येथे ५५ मुलींना सायकल वाटपप्रसंगी मान्यवरांचा सूर 

Next Post
महिला सक्षमीकरणाचा पाया शालेय जीवनापासून घडवणे आवश्यक; सी.बी.निकुंभ हायस्कुल घोडगाव येथे ५५ मुलींना सायकल वाटपप्रसंगी मान्यवरांचा सूर 

महिला सक्षमीकरणाचा पाया शालेय जीवनापासून घडवणे आवश्यक; सी.बी.निकुंभ हायस्कुल घोडगाव येथे ५५ मुलींना सायकल वाटपप्रसंगी मान्यवरांचा सूर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us