लोकप्रवाह, चोपडा दि. ६ – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदु रक्षा समिती तर्फे दि. ५ आॕक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विशेष मार्गदर्शन करीत सर्व हिंदु बांधवांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दि. ७ ऑक्टोबर या दिवशी चोपडा येथे ‘हिंदूसंघटन मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत चोपडा येथे ७ ऑक्टोबर या दिवशी ‘हिंदूसंघटन मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जुना शिरपूर रोड वरील संस्कार मंडपम या सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले आहे. या मेळाव्याला प्रमुख वक्ता म्हणून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक क्षिप्रा जुवेकर तसेच प्रशांत जुवेकर हे असणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करण्यात आले, तत्पश्चात शस्त्रपूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी यावेळी शस्त्रपूजन केले. यावेळी घनश्याम अग्रवाल, अनिल वानखेडे, अमृतराज सचदेव, शामसिंग परदेशी, पंकज बोरोले, डॉ. निर्मल टाटीया, आबा देशमुख, राजाराम पाटील, राजेंद्र शर्मा, प्रविण जैन, सुनिल बरडीया, दिपक पाटील, नरेश महाजन, विपीन जैन, यशवंत चौधरी, भगतसिंग पाटील, तुषार सुर्यवंशी, संदिप ओली, हेमकांत गायकवाड, संग्राम परदेशी, सुधाकर चौधरी आदिंसह इतरांची यावेळी उपस्थिती होती.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...