लोकप्रवाह, चोपडा दि. ६ – येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.२७/०९/२०२२ रोजी फिर्यादी नामे राकेश लोटन श्रीराव रा. तोंदे ता. शिरपुर जि. धुळे हा गलंगी येथे रस्त्यालगत उभा असतांना दोन अनोळखी इसमांनी मागाहून येत फिर्यादीला दगड मारुन फेकुन जबर दुखापत करुन फिर्यादीचे ताब्यातील मोटरसायकल हि बळजबरीने चोरुन नेली यावरुन चोपडा ग्रामीण पोलीसांत गुरनं.१२९/२०२२ भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत होते. सदर तपास अंत्यत शास्त्रीय व कौशल्यपुर्ण पध्दतीने करुन या गुन्ह्यात अहमदनगर येथील आरोपी अभय अशोक काळे व संतोष शिवाजी पवार रा. घोडेगाव ता. नेवासा या दोघांना अत्यंत शिताफीने जेरबंद करण्यात आले. त्यांच्या जवळून चोरीला गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २७/०९/२०२२ रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गलंगी शिवारात गणपुर गावाकडे जाणा-या रोडलगत फिर्यादी नामे राकेश लोटन श्रीराव रा. तोंदे ता. शिरपुर जि. धुळे हा गंलगी येथे दुकानात येऊन त्यानंतर गणपुर कडे जाणा-या रोडलगत गाडी बाजुला उभी करून नैसर्गिक विधी करत असतांना अचानक अंधारातुन दोन अनोळखी इसम मागाहुन येऊन काही अंतरावरुन फिर्यादीला दगड मारुन जबर दुखापत केली. व त्याचे ताब्यातील दुचाकी वाहन हे बळजबरीने चोरुन नेले. यावरुन चोपडा ग्रामीण पोस्टे. येथे गुरनं.१२९/२०२२ भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे तपास करीत होते. त्यानुसार तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे व सोबत मदतनिस पोहेकॉ. राजु महाजन, भरत नाईक, पोकॉ. सुनिल कोळी व विनोद पवार आदिंनी पुढील तपास अंत्यत शास्त्रीय व कौशल्यपुर्ण पध्दतीने करुन दोन संशयित आरोपी अहमदनगर जिल्हातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर लगेच तपास पथक अहमदनगर येथे दि. ३० रोजी रवाना झाले. संशयित आरोपी अभय अशोक काळे मिळुन येत नव्हता. परंतु दि. ०१/१०/२०२२ रोजी गोपनिय माहीतीवरुन तो अहमदनगर येथे असल्याची माहीती मिळाल्याने तेथे जाऊन त्याचा शोध घेतला असता तो एमआयडीसी भागात राहत असल्याचे समजले परंतु त्याला पोलीस त्याचा पाठलाग करत असल्याचे समजल्याने तेथुन त्याने पळुन जाऊन तो नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे गेला तेथे त्याला पकडुन ताब्यात घेऊन सोबतचा दुसऱ्या आरोपीबाबत विचारपुस केली असता त्याने सोबत असलेल्या आरोपीचे नाव संतोष शिवाजी पवार रा. घोडेगाव असे सांगितले. त्याचा शोध घेतला असता तो घोडगाव फाटा येथे मुख्य रोडवर असल्याचे पोलीसांना दुरुन दिसला. त्यावेळी त्याला पोलीस आले असल्याचे समजताच तो तेथुन पळु लागला. मात्र पोलीस तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे व पोकॉ. विनोद पवार यांनी आरोपीला १ किलो मीटर अंतर पळत जाऊन पाठलाग करुन पकडले. आरोपींना दि. २ रोजी कोर्टात हजर केले असता दि. ६/१०/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाला. त्यानंतर दि. ४ रोजी चोरलेली होडा शाईन मोटार सायकल जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु यांचे मार्गदर्शनखाली व पोलीस उपनिरिक्षक अमरसिंग वसावे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. राजु महाजन, भरत नाईक, पोकॉ. सुनिल कोळी, विनोद पवार, राहुल रणधीर व होमगार्ड संदीप सोनवणे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा ग्रामीण चे प्रभारी अधिकारी सपोनि. संदिप दुनगहु यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...