लोकप्रवाह, एरंडोल दि. ०९ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्यावतीने एरंडोल तालुक्यातील रवंजे बु. गावातील बाजार परीसरात दिनांक 8 ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान 2.0 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत बाजार परीसरात युवकांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली. तसेच गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
याप्रसंगी अजय कोळी, अमोल चौधरी, देवेंद्र कोळी, दिपक कोळी, हिरालाल कोळी, राकेश पाटील,भाग्येश मोरे, भावेश सपकाळे, वसंत निकम आदी युवकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे एरंडोल तालुका समन्वयक मुकेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.