लोकप्रवाह, चोपडा दि. 08 – शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावर साधारण एक महिन्यापासून नगरपरिषदेंतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी खोदकाम करुन ठेवण्यात आले आहे. मात्र चार ते पाच दिवसाच्या या कामाला तब्बल महिनाभर लागत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातल्या त्यात या खोदकामाच्या अवतीभवती कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने अपघात होवू शकतो हे लोकप्रवाहने लक्षात आणून दिल्यावर संबंधित विभागामार्फत अवघ्या काही मिनिटात बॕरिकेटस लावण्यात आले.
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हे तेजस कंस्ट्रक्शन या कंपनीमार्फत सुरु आहे. याच अनुषंगाने महिनाभरापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावर भलेमोठे खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच लोकप्रवाह चे संदिप ओली यांनी नगरपरिषदेचे शहर आभियंता सचिन गवांदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर काम हे पाणीपुरवठा योजनेंतर्गत तेजस कंस्ट्रक्शन कंपनी करीत असल्याचे सांगितले. व सदर काम चार ते पाच दिवसात पुर्ण होणार असे तेजस कंस्ट्रक्शन कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप काम अपुर्ण असल्यामुळे त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले. व याबाबत तेजस कंस्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॕनेजर मनोज शिंदे यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी पुढील मंगळवारी कामास सुरुवात करुन चार दिवसांत काम पुर्ण होणार असे सांगितले.
त्यानंतर लोकप्रवाह चे संपादक संदिप ओली यांनी संबंधित प्रोजेक्ट मॕनेजर यांचेशी संपर्क करुन सदर खोदकामाबाबत विचारणा केली असता त्यांनी पाणीपूरवठ्याची मुख्य पाईपलाईनवर शहरातील भागात पाणीपुरवठा सुरु असल्यामुळे कामाला विलंब होतोय असे सांगितले. मात्र या सर्व बाबींचे अगोदरच नियोजन करुन सदर खोदकाम केले असते तर अवघ्या चार दिवसांत काम पूर्ण झाले असते मात्र पुर्वनियोजनाच्या अभावामुळे काम रेंगाळत असून याचा नाहक त्रास त्या मार्गावरुन ये-जा करणारे शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आदिंसह शहरवासियांना होतोय तसेच खोदकामाच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसून जर अपघात झाला तर तुम्ही जवाबदार राहणार असे ठणकावून सांगितले असता अवघ्या काही मिनिटात त्याठिकाणी बॕरिकेटस ठेवण्यात आले. व पुढील काम हे मंगळवारी सुरु करुन चार दिवसात पुर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याप्रकारे निगरगठ्ठ व निष्काळजीपणे काम करणाऱ्या कंपनीवर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.