लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ डिसेंबर : महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 22 न नुसार पोलिस आस्थपना मंडळ क्रं. 2 यांनी विहीत कालावधी पुर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे. जळगाव पोलिस दलातील सुरेश शिंदे यांची पुणे येथे तर विठ्ठल ससे यांची औरंगाबाद शहर येथे बदली झाली आहे. संदीप भटू पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथून जळगावला बदली झाली आहे. तर चोपडा शहर चे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीणला बदली झाली आहे.
याशिवाय बबन आव्हाड यांची गोंदीया येथून जळगावला, रंगनाथ धारबळे हे गोंदीया येथून जळगावला येत आहेत. रंगनाथ धारबळे यापुर्वी जळगाव आणि धुळे येथे कार्यरत होते. उद्धव डमाळे हे देखील गोंदीया येथून जळगावला येत आहेत. शरद इंगळे यांची औरंगाबाद येथून तर कावेरी कमलाकर यांची राज्य गुप्तवार्ता विभाग येथून जळगावला बदली झाली आहे. शिल्पा गोपीचंद पाटील यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे येथून जळगावला बदली झाली आहे.
जळगावचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि दिलीप भागवत हे पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत. यापुर्वी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा शहर येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक विकास वाघ यांची अहमदनगर येथून धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. यापुर्वी जळगाव येथे असलेले व सध्या नाशिक ग्रामीणला असलेले अशोक रत्नपारखी यांची बुलढाणा येथे तर भाऊसाहेब पटारे यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे.