Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

१० हजाराची लाच घेतांना सहकार अधिकारी जेरबंद; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 9, 2022
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
१० हजाराची लाच घेतांना सहकार अधिकारी जेरबंद; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!
लोकप्रवाह, जळगांव दि. ०९ डिसेंबर – दुसखेडा ता.यावल येथील तकारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदाराविरुद्ध नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष शशिकांत नारायण साळवे, वय-54, सहाय्यक सहकार अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जळगाव  वर्ग-3 रा. मंगलमुर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ, जळगाव यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी सन 2013 मध्ये  दुसखेडा ता.यावल येथील गट क्रं.१६५ मधील ९७ आर इतकी टायटल क्लिअर शेत जमीन विहीत खरेदीखत करून विकत घेतली होती. नंतर  सन २०१४ मध्ये सदर शेतजमीनीचे पुर्वश्रमीचे मूळ मालक निलेश पाटील यांनी सदर शेतजमीन परत मिळण्यासाठी भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला असून सदरचा दावा न्यायप्रविष्ठ आहे. सन -2018 मध्ये निलेश  पाटील यांनी पुन्हा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांच्या कार्यालयातदेखील सदर शेत जमीन परत मिळण्यासाठी दावा दाखल केला. सदर दाव्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी तक्रारदार हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयात हजर राहीले. नंतर सदर दाव्याचा निकाल हा लागला होता म्हणून संबंधीत आलोसे शशिकांत साळवे यांना कार्यालयात जावून भेटून त्यांचे कडून सदर निकालाची प्रत प्राप्त करून घेतली. सदर निकालाच्या  अंतिम आदेशात  महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम सन 2014 चे कलम अन्वये आदेश असे नमूद असून त्याची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव यांना देण्यात आली व तक्रारदार यांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांचे स्वतःवर सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवु शकतो तसेच सदरची शेत जमीन परत करण्याचे आदेशीत केले होते. म्हणून तक्रारदार यांनी त्याविरुद्ध अपील करण्याचे ठरवून त्यासाठी लागणारे सदर निकालाच्या सत्यप्रती घेण्यासाठीचा लेखी अर्ज संबंधीत आलोसे यांचेकडे दिला होता.
आलोसे शशिकांत नारायण साळवे, सहाय्यक सहकार अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जळगाव
       नंतर तक्रारदार सदर दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती घेण्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, जळगाव येथे जावून संबधीत आलोसे यांना भेटले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदार हे  नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष आलोसे शशिकांत साळवे यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
           सदर कारवाई नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सौ. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, अँटी करप्शन ब्युरो, जळगांवचे पोलीसा उपअधीक्षक  शशिकांत एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक एस. के. बच्छाव यांचे नेतृत्वाखाली स.फौ. दिनेशसिंग पाटील, पोना.बाळू मराठे, पोकॉ. राकेश दुसाने आदिंच्या पथकाने केली.
Post Views: 521
Previous Post

अवैध रेती वाहणारे टॕक्टर व ट्रॉली दुर्घटनाग्रस्त; महसूलच्या गस्ती पथकाच्या पाठलागानंतर घडला प्रकार!!

Next Post

पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीणला बदली; पोलीस निरिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या जाहीर!!

Next Post
पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीणला बदली; पोलीस निरिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या जाहीर!!

पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीणला बदली; पोलीस निरिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या जाहीर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us