लोकप्रवाह, चोपडा दि. २८ जाने. (संदिप ओली) – तालुक्यातील अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक पंटरच्या माध्यमातून चार हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिकाकडून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याने ही कारवाई झाली आहे. ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी अगोदर पाच हजाराची मागणी करण्यात आली, तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या अडावद पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपायास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. योगेश संतोष गोसावी, वय-३५ पोलीस अंमलदार /ब.नं.१८४०, नेमणुक – अडावद पोलीस स्टेशन. (वर्ग-३) रा. पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद ता.चोपडा व खाजगी पंटर चंद्रकांत काशिनाथ कोळी, वय-३६, व्यवसाय-होममार्ड रा. कोळीवाडा, अडावद ता. चोपडा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांच्या स्वतःचे नावे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर असुन ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. सदर ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जर वाळू वाहतूक करायची असेल तर तुला दरमहा आमचे साहेबांना ५०००/- रुपये द्यावे लागतील असे सांगुन तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष ४०००/- रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रं.२ यांनी अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात आलोसे क्रं.१ व पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोना. ईश्वर धनगर, पोकॉ. राकेश दुसाने, सफौ. दिनेशसिंग पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, म.पोहेकॉ. शैला धनगर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदिप पोळ, पोकॉ. सचिन चाटे, पोकॉ. प्रणेश ठाकुर आदिंनी केली.