Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सातबाऱ्यावर नाव लावणेसाठी लाच; महिला तलाठीला एसीबीकडून रंगेहाथ अटक!

जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 31, 2023
in क्राईम
0
२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, भुसावळ दि. ३१ जाने. – तालुक्यातील सजा खडका हद्दीमध्ये नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्याचा अर्ज दाखल करून घेणे व उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात महिला तलाठी मनिषा निलेश गायकवाड, वय-३८ रा. मोरेश्वर नगर, साकेगाव शिवार, भुसावळ  यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३००/- रुपये लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले.
आलोसे मनिषा निलेश गायकवाड, तलाठी
               याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स – २ व खरेदीखत घेऊन ७/१२ उताऱ्यावर नाव लावणेचा विहीत अर्जासह खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तलाठी, सजा खडका व साकरी ता. भुसावळ कार्यालयात अर्ज सादर केला असता वरील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेण्याच्या व ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३००/- रुपये लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
                 सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, मपोहेकॉ. शैला धनगर, पोना. ईश्वर धनगर, पोकॉ. राकेश दुसाने, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, पोना. जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, पोकॉ. प्रदिप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी, महेश सोमवंशी आदिंनी केली.
Post Views: 561
Previous Post

वाळू व्यवसायिकाकडून लाच घेतांना पोलीस शिपायास एसीबीकडून रंगेहाथ अटक

Next Post

चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !

Next Post
चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !

चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us