Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषद टोकाचा लढा उभारणार; अधिवेशन काळात तीव्र आंदोलन!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 3, 2023
in सामाजिक, राजकीय
0
मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे
लोकप्रवाह, सांगली दि. २७ फेब्रु.  : महाराष्ट्र शासनाने गेली अनेक वर्षे मागासवर्गीय समाजाला दोन एकर बागायत जमीन व चार एकर जिरायत जमीन देण्याची योजना तयार करून त्या योजनेमध्ये अशा काही अटी घातल्या आहेत कि, ती योजना नसून घोटाळा व खोळंबा झालेल्यातला प्रकार आहे. सदर योजनेवर निधीची तरतूद भरमसाठ केली जाते. मात्र मागासवर्गीयांचा हाच निधी सोयीनुसार इतर योजनेकडे वर्ग केला जातो, हि बाब अतिशय गंभीर आहे. मागासवर्गीयांना जमिनीचे मालक होता यावे यासाठी “कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना” ही फक्त एक देशी गाजरच असल्याची घणाघाती टीका पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात प्रा. सुभाष वायदंडे यांनी पुढे म्हटले आहे की, मागासवर्गीय समाजाचे राज्य शासन व केंद्र शासनात नेतृत्व करणारा एकही दलित नेता सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व त्यामध्ये असलेल्या जाचक अटी काढून ही योजना प्रभावी राबवण्यास सोपी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. शिवाय सदर नेत्यांना या योजनेतल्या अटी व ही योजनाच माहीत नसल्यामुळे सत्तेतील दलित नेते हे मागासवर्गीयांचे शत्रूच असल्याची टीका केली. त्याबरोबरच मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आग्रह न धरणाऱ्या सत्तेतील दलित नेत्यांवर जनहित याचिका दाखल करणार असल्याचे प्रा. वायदंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात
म्हटले आहे.
प्रा. सुभाष वायदंडे राष्ट्रीय अध्यक्ष, पुरोगामी संघर्ष परिषद
मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत प्रसिद्धी पत्रकात शेवटी प्रा. वायदंडे यांनी म्हटले आहे की, सात वर्षाआतील शिक्षा असलेल्या आरोपीला पोलीस अटक न करता थेट न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली असल्यामुळे पोलीस व आरोपी यांच्यात तोडपाणी होऊन सदर तरतुदीचा आधार घेत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपीलाा मोकाट सोडून न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्याची ताकद कमी केली जात असल्याचेही म्हटले आहे. सदर बाब ही मागासवर्गीयांवर अन्याय करण्यास वाट मोकळी करणारी असल्यामुळे राज्य व केंद्रीय समाज कल्याण मंत्र्यांचा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राजीनामा मागणार असल्याचेही शेवटी प्रसिद्धी पत्रकात प्रा. सुभाष वायदंडे यांनी म्हटले आहे.
Post Views: 935
Previous Post

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेत गणेश महाजन याने पटकाविले कास्यपदक!

Next Post

गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास अटक; तब्बल ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास अटक; तब्बल ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us