Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 23, 2023
in चोपडा, ठळक बातमी
0
चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक २३ :- महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकने कोल्हापूर शाहू भूमी ते दीक्षा भूमी, नागपूर अशी जनजागरण यात्रा २० नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. ती यात्रा २८ ऑक्टोबर रोजी चोपडा तालुक्यात येत आहे. यात्रेत आयटक अध्यक्ष कॉ. सी. एन. देशमुख, सचिव शाम काळे, आशा नेते कॉ. प्रा. राजू देसले, अंगणवाडी अध्यक्ष माधुरी क्षीरसागर, किसान सभा अध्यक्ष कॉ. ॲड.  हिरालाल परदेशी आदीसह  तब्बल २० नेते सहभागी राहणार आहेत.
याप्रसंगी तालुक्यातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, सेवानिवृत्त कामगार व शेतमजूर आदींची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या दृष्टीने नियोजन करण्यासाठी चोपडा शहरातील आयटक संपर्क कार्यालयात कॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सर्वश्री काँ. भास्कर सुखराम सपकाळे  व प्रकाश सपकाळे तुरखेडा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर कंडारे यावल, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ वासुदेव कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य कॉ. महेंद्र धनगर, एसटी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे कैलास पाटील, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्ष कॉ. वत्सला पाटील, ममता महाजन, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
                            त्यावेळी यात्रेचे २००० हस्तपत्रके वितरण करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांना जी पगारवाढ  जाहीर झाली. त्यांचा तालूकाव्यापी आनंदी मेळावा, अंगणवाडीच्या ४ डिसेंबर संप, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २८ नोव्हेंबर रोजीचा इशारा संप, शेतकरी, शेतमजूर व आदिवासींचे जमीन नावे करणे, दावे निकाली काढणे, शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव, सेवानिवृत्त कर्मचारी व शेतकरी शेतमजूर यांना किमान ५००० रुपये पेन्शन या प्रश्नी १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानसभेवर विराट मोर्चा धडकणार आहे. “देशातील कामगार विरोधी धोरणे, भांडवलदार कॉर्पोरेट घराणे त्यातही अडाणी अंबानी याना झुकते माफ देणारे, जाती धर्माचे नावे श्रमिक जनतेत फूट पाडणारे भाजप सरकार २०२४ को चले जाव ” हा मुख्य नारा ज्या इंडिया आघाडीने दिला त्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आदी पक्षांचे नेत्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून त्या पक्षांचे जिल्हा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे जनजागरण यात्रा तयारी आयोजन समितीने जाहीर केले आहे.
Post Views: 312
Previous Post

चोपडा : पोक्सो कायद्यांतर्गत एकास 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..

Next Post
अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..

अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us