Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 

शेतमजूर युनियन मोर्चात इशारा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 24, 2024
in चोपडा
0
शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि.२४ – येथील तहसीलदार कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे  मोर्चा काढण्यात आला. यावेळी आताच्या सरकारच्या काळात शेतमजूर, आदिवासी, असंघटित कामगार व दलित यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावे म्हणून यापुढे दरमहा शेतमजूर युनियन तर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वासुदेव कोळी व जिजाबाई राणे यांनी केले.
नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना निवेदन कॉ. अमृत महाजन व इतर
याबाबत सविस्तर असे की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आदिवासी व कष्टकरी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही. अदाणी व अंबानी यासारख्या उद्योगपतींकडेच जास्त लक्ष देत आहे. महागाई, बेरोजगारी तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. गुजरातमध्ये तर बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपींना जन्मठेप झाली परंतु त्या आरोपींना गुजरात सरकारने मोकळे केले. काहींनी तर त्यांच्या सत्कारही केला. मणिपूरमध्ये देखील २ आदिवासी महिलांवर अत्याचार झाला. त्याची साधी दखलही केंद्र सरकारने घेतलेली नाही. देशात अशा अनेक अत्याचार्याच्या घटना घडत आहेत.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शेतमजुरांची मानधन प्रकरणे नापास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे बरेच गरजू लाभार्थी या आवश्यक लाभापासून वंचित राहत आहेत. या योजनेंतर्गत मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंज्या स्वरुपाचे आहे. म्हणून कमीत कमी तीन हजार रुपये मानधन मिळावे. त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजनेअंतर्गत मतदान कार्ड आधार कार्ड तफावत असल्यास मेडिकल ऑफिसर यांनी केलेले वैध धरावे. गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारचे दोनशे रुपये कमी मिळत आहेत ते फरकासह अदा करावा. रहिवासी पुरावा म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी १ वैध समजावा. मेडिकल सर्टिफिकेट असल्यास प्रकरण नापास करू नये अपूर्णता प्रकरणातील अपूर्णता त्रुटी पूर्ण करून ती परत फेर चौकशीसाठी ठेवणे. जंगल गायरान जमिनीवरील भूमी आदिवासी यांची अतिक्रमणे नियमाकुल  करावी. खेडोपाडी बेघर शेतमजुराला जागा उपलब्ध करून द्या. व  किमान एक हजार चौरस फूट जागा घरकुलासाठी मिळावी तसेच बांधकामासाठी किमान पाच लाख रुपये निधी मिळावा. आदिवासींचे प्रलंबित वनदावे मंजूर करा, शहरी भागातही दारिद्र्य खालील लोकांना घरकुल बांधण्याच्या प्रस्ताव मंजूर करावा, ग्रामीण भागात शेतमजूर राहत असलेली जागा शहरी झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या नावे घराची जागा करा आदि मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले. श्रावणबाळ व इंदिरा गांधी प्रकरणात त्रूटी असेल तर तशी माहिती अर्जदारांना कळविले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सदर मोर्चात जीजाबाई राणे, ठगूबाई भोई, सुमनबाई माळी, विश्वास पाटील, रतिलाल भिल्ल, विमलबाई माळी, शांताराम पाटील, सुमनबाई चौधरी, सुमन माळी, मंगलबाई धनगर, लताबाई शेटे, नजमा बी गफार, गणेश माळी, चंद्रकला माळी आदींसह इतरांची उपस्थिती होती.
Post Views: 237
Previous Post

चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांच्या मेळाव्याचे आयोजन

Next Post

एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा तर दुसरीकडे महर्षी वाल्मिकींच्या वंशजांची व्यथा..

Next Post
एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा तर दुसरीकडे महर्षी वाल्मिकींच्या वंशजांची व्यथा..

एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा तर दुसरीकडे महर्षी वाल्मिकींच्या वंशजांची व्यथा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us