Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

५ ते ११ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम; नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य महाप्रसाद

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, सामाजिक
0
संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधवांच्या वतीने चोपडा येथे दि. ५ ते ११ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माळी समाज मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या सप्ताहामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक कार्यक्रम.

सप्ताहाच्या काळात दररोज काकड आरती, हरिपाठ तसेच विविध नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुनील महाराज जामनेर, ६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. शुभम महाराज मंदाने (शहादा), ७ ऑगस्ट रोजी ह.भ.प. उमेश महाराज दहिवद, ८ ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्रीकांत महाराज खडके, ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. गजानन महाराज सोनटक्के (पारोळा), १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. भानुदास महाराज (भुसावळ) आणि ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भावेश महाराज (विटनेर) यांच्या कीर्तनाचा भाविकांना लाभ मिळणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता माळी समाज मंगल कार्यालय येथे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे.

हजारो भाविकांसाठी महाप्रसाद व पालखी मिरवणूक

दि. ११ ऑगस्ट रोजी पंचक्रोशीतील तसेच सर्व समाज बांधवांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे ७ ते ८ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी शहरातील विविध भागातून संत सावता महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, कीर्तन-प्रवचनाचे श्रवण करून संत सावता महाराजांच्या विचारांचा संदेश आत्मसात करावा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 32
Previous Post

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us