Tuesday, March 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा तर दुसरीकडे महर्षी वाल्मिकींच्या वंशजांची व्यथा..

राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांची खंत

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 24, 2024
in जळगांळ जिल्हा, सामाजिक
0
एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा तर दुसरीकडे महर्षी वाल्मिकींच्या वंशजांची व्यथा..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २४ : भारतासह अख्ख्ये जग ज्या क्षणांची वाट पाहत होते त्या प्रभु श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नुकतीच श्रीक्षेत्र अयोध्या पुण्यनगरीत झाली. अयोध्या पुण्यनगरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला महर्षी वाल्मिकी ऋषींचे नावही देण्यात आले. हि आदिवासी कोळी जमातीच्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतभर जागोजागी संगीत रामायणाच्या कथा सुरू आहेत. जे रामायण महर्षी वाल्मिकींनी लिहीलेले आहे. ते महर्षी  वाल्मिकीं खान्देशातील चाळीसगाव येथील वालझरी गावातील आदिवासी कोळी जमातीचे होते. परंतु अजुनही आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना त्यांच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी लढावे लागत आहे. राज्यभर महाआंदोलन अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, रास्तारोको, ठिय्या धरणे आंदोलन करावे लागत आहे. तरीही शासन प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत ह्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात व वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हा लढा दिवसेंदिवस तीव्र होणार आहे. जळगावात अशाचप्रकारे जी. एस. ग्राऊंडवर एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा सुरू आहे तर त्याच ठिकाणी दुसरीकडे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वंशजांची व्यथा (उपोषण) सुरू आहे, अशी खंत आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, चोपडा यांनी व्यक्त केली आहे.
          उपोषणस्थळी उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे भोकर, पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लखिचंद बाविस्कर, मुकेश सोनवणे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, डॉ. कमलाकर पाटिल, डॉ. गोकुळ बिर्हाडे, अॕड. गणेश सोनवणे, कैलास सपकाळे, आत्माराम नन्नवरे, अनिल कोळी, भरत सपकाळे, रतन महाराज, युगांत कोळी, शांताराम नागरूत, किशन भोलाणे, विजय भोलाणे, धनराज सोनवणे, प्रदीप कोळी, बाबुराव सपकाळे, अण्णा सूर्यवंशी, अरुण सोनवणे, राजेंद्र जाधव, चंद्रकांत कोळी, श्रावण कोळी, सुरेश रायसिंग, भोलेनाथ काकडे, माधवराव काकडे, रवींद्र काकडे, सिताराम जाधव, गणेश कोळी, गोपाल कोळी, वाल्मीक कोळी, जिभाऊ काकडे, माधव मोरे, विशाल कोळी, कैलास मोमे, भाऊसाहेब कोळी, ज्ञानेश्वर कोळी, कृष्णा काकडे, रोहिदास सोनवणे, गणेश चव्हाण, दीपक काकडे, धनराज काकडे, दत्तू कोळी, गोकुळ कोळी, रोहित इंगळे, सुक्राम सोळुंखे, श्रीक्रिष्ण सुरडकर, आकाश सुरडकर, चेतन सुरडकर, सुरेश जाधव, राजू सुरळकर, सचिन पवार, अरुण कोळी यांची उपस्थिती होती.
Post Views: 966
Previous Post

शेतमजुरांच्या प्रश्नांवर दर महिना आंदोलन करणार..!! 

Next Post

चोपडा रोटरी उत्सवाची झाली उत्साहात यशस्वी सांगता

Next Post
चोपडा रोटरी उत्सवाची झाली उत्साहात यशस्वी सांगता

चोपडा रोटरी उत्सवाची झाली उत्साहात यशस्वी सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us