Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 28, 2024
in चोपडा, जळगांळ जिल्हा, ठळक बातमी
0
गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – तालुक्याला निसर्गाने भर भरून दिलेले असतानाही इथले शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस आपल्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे. रस्ते नाहीत, पाणी नाही, पिकाला भाव नाही, शेती पीक विम्याचा मोबदला नाही एकूणच चोपडा तालुका हा राजकीय अनास्थेचा बळी ठरला आहे असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शामिभा पाटील यांनी येथे व्यक्त केले. त्या चोपडा येथील गौतम नगर या अतिक्रमित जागेच्या प्रश्नावर भेट देण्यासाठी आल्या असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होत्या.
पाहणी करतांना नागरिकांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील
यावेळी त्यांनी सांगितले की, अतिक्रमण कोणत्याही जागेवर असो ते तात्काळ काढता येत नाही, त्याला कायद्याने पंधरा दिवसांच्या अंतराने तीन नोटिसा दिल्या पाहिजेत ४५ दिवसांचा अवधी तेथील रहिवाशांना दिला पाहिजे. गौतम नगर भागात राहणाऱ्या लोकांची आज तिसरी पिढी तिथे राहत आहे. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्यांना आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत, जागेवर जावून रहीवास्यांशी बोलून पुढचा निर्णय जाहीर करू, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी गौतमनगर येथे प्रत्यक्ष जावून तेथे पाहणी करीत तेथील रहिवासियांशी बोलणे केले. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच याबाबत न्यायालयीन लढाई लढल्या जाईल असे सांगितले. व गरज पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असेही त्यांनी बोलतांना सांगितले. याप्रसंगी अशोक बाविस्कर, डॉ.नवल मराठे, गोपाळ सोनवणे, समाधान सोनवणे, राजेंद्र बाविस्कर  यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.
आमदार लताताई सोनवणे यांना निवेदन देतांना गौतमनगर येथील रहिवासी महिला व इतर
सदर समस्येबाबत चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई सोनवणे यांनासुद्धा दि. २६ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे व त्यामध्ये आम्हाला बेघर होण्यापासून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देतांना प्रभाकर सोनवणे, विकी शिरसाट, सुधाकर सोनवणे, राहुल सपकाळे, मोहन सोनवणे, संदिप मैराळै, विजय वानखेडे, लखन सपकाळे, पंकज बाविस्कर, समाधान पवार, महेंद्र बाविस्कर आदिंसह जेष्ठ नागरिक, महिला व तरुण वर्गाची उपस्थिती होती.
Post Views: 447
Previous Post

ग. स. सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

Next Post
मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us