Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ग. स. सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा

संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 26, 2024
in चोपडा, सहकार
0
ग. स. सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २६ :- जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ( ग. स. सोसायटी ) विभाग चोपडा शाखेत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर तसेच मंगेश भोईटे यांनी संचालक झाल्यापासून चोपडा शाखेचे ध्वजारोहण हे स्वतः न करता ती संधी दोघेही संचालक सभासदांना देत असतात. सभासदांना खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करुन देण्याच्या सभासद हिताच्या विविध योजना संस्थेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे नेतृत्वात सुरु असून चोपडा येथील संचालकांनी सभासदांचा सन्मानाचा भाग म्हणून चोपडा शाखा अंतर्गत ध्वजारोहण व पात्र सभासदांना मिळणारे सर्व धनादेश देखील आजवर सभासदांच्याच हस्तेच वितरित केलेले आहेत. संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गेल्या दिड वर्षापासून ग. स. सोसायटीत खऱ्या अर्थाने संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे सभासदांची सत्ता आहे.
ध्वजारोहण करतांना जेष्ठ सभासद असलमखान
याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सभासदांमधूनच चोपडा उर्दु शाळेतील शिक्षक असलमखान सरफराज खान यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी  सहकार गटाचे नेते व शिक्षक संघटनेचे नेते आर. एच. बाविस्कर, उर्दू संघटनेचे प्रतिनिधी शेख सय्यद जुनेद तसेच प्रमोद देवरे व आशिष बडगुजर यांचेसह बहुसंख्य सभासद व कर्मचारीवृंद हजर होते. याप्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे संचालक मंगेश भोईटे यांनी तर स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन उपशाखाधिकारी संजय पाटील यांनी तर आभार उज्वल शिंदे यांनी मानले .
Post Views: 405
Previous Post

रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानादारांवर शहर पोलीसांच्या कारवाईचा बडगा

Next Post

गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील

Next Post
गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील

गौतमनगर येथील रहिवासीयांना न्याय मिळणार; शमिभा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us