Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप व इंडिया अलायंस तर्फे मुक मोर्चा

निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 24, 2024
in वर्धा जिल्हा, राजकीय
0
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप व इंडिया अलायंस तर्फे मुक मोर्चा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २५ – येथील आम आदमी पार्टी व इंडिया अलायन्स यांचे येथील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा तीव्र निषेध करीत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढून केंद्र सरकारविषयी निषेध नोंदून आप चे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुक्त करण्यात यावे, यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन सादर करताना आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, किसन अधिकार अभियान मुख्य प्रेरक अविनाश काकडे, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापुरकर, आपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले, बाळा  माऊसकर, ॲड. दुर्गाप्रसाद मेहरे, संजय आचार्य, कुणाल लोणारे, मंगेश शेंडे, आकाश सुखदेवे, नितीन झाडे, प्रवीण कलाल, असलम पठाण, ईसाराइल शेख, निषाद अली, संदीप डंभारे, वासुदेव राठोड, पंकज सत्यकार, अमर शेंडे, शाहरुख पठाण, हाफिज भाई, धनंजय अग्रवाल, पप्पू पटेल, अजय डोंगरे, नंदकुमार कांबळे, प्रणित ठाकरे, निलेश देशमुख, अनुराधा देशमुख, ताराचंद लोखंडे, पंकज म्हसकर, दत्तु भोम्बे, गौतम वासे, संजय भगत, देशकर, संदिप भगत आदिंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना काल रात्री लोकतांत्रिक मूल्यांना पायदळी तुडवून तथा तथ्यहिन आरोपातून अटक करण्यात आली असून ही अटक पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित असून आम आदमी पार्टीचा राजकीय विस्तार थांबवण्याच्या हेतूने केंद्रातील भाजपा सरकार सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टी विरोधात बदल्याचे राजकारण करीत आहे. तीन वेळा दिल्लीमध्ये माननीय अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टीचा पराभव करून सरकार स्थापन केले, ही पराभवाची खंत भारतीय जनता पार्टी पचवु शकली नाही व आज भाजपा केंद्रामध्ये आहे तेव्हा सत्तेचा दुरूपयोग करून आम आदमी पक्षाच्या पुढार्‍यांना कारण नसताना अटक करून घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे, यामध्ये सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया व आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तथ्यहीन आरोपातून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले, याबद्दल देशभर सामान्य माणसात असंतोष पसरला असून सामान्य माणूस रोष व्यक्त करतो आहे, केंद्रामध्ये बसलेले भाजपा सरकार विघटनात्मक हातांनी संविधानिक मूल्याची हत्या करते आहे, मुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीला राजकीय बदल्याच्या भूमिकेतून अटक करून जणू भारतीय जनता पार्टी लोकशाही व्यवस्थेवर सरळ हल्ला करीत आहे. 
श्रीकांत बी. दौड
जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, वर्धा
Post Views: 250
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल येथे ग्रॅज्युएशन सेरेमनीचे यशस्वी आयोजन

Next Post

चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us