Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण

बुलढाणा व जळगांव जिल्यातील मानधनात तफावत का? आयटक चा सवाल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 17, 2024
in शासकीय
0
निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, जळगांव दि. 17 – महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर सरकारला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत काही कर्मचारी नेमावे लागतात. त्यात प्रीसाईडिंग अधिकारी, 3 मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस, एनसीसी केडर, स्वच्छता कर्मचारी तसेच मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांची लहान मुलं सांभाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या बालसंगोपन केंद्रासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका नियुक्त केलेले होते. त्यात त्यांना खालीलप्रमाणे मानधन एक दोन तीन दिवसाकरता देण्यात आले होते. त्यात प्रीसाईडिंग अधिकारी 350 रुपये/प्रतिदिन, मतदान अधिकारी यांना 250 रुपये/प्रतिदिन, शिपाई २०० रुपये, पोलीस २५०रुपये अशा तऱ्हेने मानधन देण्यात आले. परंतु बालसंगोपन केंद्रासाठी कार्यरत आशावर्कर, ग्रामपंचायत शिपाई, स्वच्छता कर्मचारी यांना १२/१२ तास राबवून फक्त १५० रुपये मानधन देण्यात आल्याने असंतोष निर्माण झालेला आहे.
                  दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात शिपाई व  अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी 550 तर आशावर्कर व स्वयंसेवक यांना 350 रुपये मानधन देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातच एवढे कमी मानधन का देण्यात आले? याबाबत आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा होत संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या निवडणूक विभागामार्फत ही निवडणूक होत असता जळगाव जिल्ह्यात वेगळे दर तर बुलढाणा जिल्ह्यात वेगळे दर का? याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खुलासा करणे आवश्यक आहे.
            मतदान दिनी या कर्मचाऱ्यांना अक्षरशः राबवून घेतले. काही ठिकाणी तर मुख्य सेविका यांनी अंगणवाडी मदतनीसांना पण हजर ठेवा, असे आदेश दिल्याने मदतनीस या सुद्धा हजर राहिल्यात. त्यामुळे 150 रुपये मधून निम्मे 75 रुपये मदतनिसांना सुद्धा द्यावे लागले. बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत असंतोष आहे अशा तऱ्हेने केंद्र सरकारचा हा व्यवहार खाजगी व्यवस्थापनापेक्षाही अधिक प्रमाणात कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. याबाबत चौकशी करून बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच जळगांव जिल्यातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका व आशावर्कर यांना मानधन अदा करण्यात यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा आयटक तर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी केली आहे. किमान वेतन पेक्षाही निम्म्या वेतनावर राबवून घेतलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतनइतके मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉ. अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेला आहे.
Post Views: 255
Previous Post

चोपडा महाविद्यालयात पेटंट प्राप्त गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

Next Post

चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

Next Post
चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us