Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वसुंधरा संवर्धनासाठी युवा संघर्षं सामाजिक संघटनेचा सामाजिक उपक्रम

१७०० वृक्ष वाटप करीत पर्यावरण संतुलनासाठी कटीबद्ध   

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 14, 2024
in वर्धा जिल्हा, वैशिष्ट्यपूर्ण
0
वसुंधरा संवर्धनासाठी युवा संघर्षं सामाजिक संघटनेचा सामाजिक उपक्रम

टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) – वसुंधरेवरील पशु, पक्षी आणि मानवी जीवनावर वृक्षतोडीमुळे कमी होणारी झाडाची संख्या यामुळे भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही आधुनिक काळाची नितांत गरज असल्यामुळे त्यासाठी झाडे लावून ती जगली तरच वसुंधरा आणि सृष्टीतील प्राणीमात्र यांचा समतोल कायम राहील. या उदात्त हेतूने युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघे यांच्या वतीने मोफत १७०० वृक्ष रोपटे लागवडीसाठी मान्यवरच्या हस्ते  परिसरातील नागरीकांना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम पिपरी मेघे येथे दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता पार पडला.  कार्यक्रमाची सुरवात मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वल व पाच वृक्ष रोपटांची पूजा करून झाली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

या समाजभिमुख कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संघटनेचे अध्यक्ष उमेश खांडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. ज्ञानदा फणसे, वैदकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सहासिक जनशक्ती संघटना अध्यक्ष रवि कोटंबकर, युवा सोशल फोरम अध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी नगरध्यक्ष शेखर शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, माजी प. स. सदस्य डॉ. बाळा माऊसकर, उपसरपंच गजानन वानखेडे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश ईखार, जेष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, सामाजिक कार्यकर्ता महादेव शेंडे, वैद्यकीय जनजागृती मंच सदस्य डॉ. यशवंत हिवंज, सेवा निवृत्त क्रीडाअधिकारी प्रशांत दोंदल, शिवानी राणा रणनवरे, अतुल पिसे, प्रवीण हाडे, मंडळ अधिकारी पिपरी मेघे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती .

कार्यक्रमाला उपस्थित परिसरातील नागरिक

अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघेचे वतीने करण्यात आले होते. त्याप्रसंगी आयोजकांनी सर्व  मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत केले. सामाजिक दायित्वाची भान असलेली युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघे यांनी प्रत्येकांना एक वृक्ष  वाटप केले. जे वृक्ष पर्यावरणासाठी गरजेचे आहे. आज वनऔषधी वृक्षतोड झाल्यामुळे ते लुप्त होत चालले आहे. परिणामी पशुपक्षानां खाद्य मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रजाती लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पशुपक्षी यांना  उंबर, जांभूळ, शेवंगा, चीचबिली, बेल, आवळा झाडांची गरज आहे. आदी झाडांचे त्यांनी वाटप केले. त्यामुळे पर्यावरण संतुलनाबरोबर पशु पक्षी यांचे सुद्धा रक्षण होईल. हा उद्देश ठेवून रोपांची निवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून या संघटनेने केली आहे. समाजात अशाच सामाजिक कार्य करण्याची गरज असल्याचे मनोगत यावेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.

शपथ घेताना उपस्थित सर्व मान्यवर

 

याचबरोबर सर्व मान्यवर व उपस्थितांना संचालनकर्त्यानी वृक्षवल्ली व सभोवतालच्या जल, मृद आणि वायू या घटकांना सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवून त्यांचे संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात संवेदनशीलतेने वागण्याची शपथ दिली हे कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले.     

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक गुढेकर तर सुत्रसंचालन अविनाश जाधव आणि आभार मारोती उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजानन भातकुलकर, सुधीर वसू, आनंद धामणकर, गजानन वानखेडे, महिंद्रा लोखंडे, मयूर उईके, रमेश आंबटकर, अरविंद सहारे, हरीश कनोजे, अंकुश धुर्वे, आदित्य दाते, अभिषेक ढुमने, मुकुंद अडसळ, राज ठाकरे, रमेश आंबटकर, हेमराज नेताम, भगवान गडकरी, प्रदीप श्रिरसागर, पद्माकर खेकडे, सुनील भागवतकर , गजानन कदम, अरविंद लोहे, दीपक पेढेकर, गजानन भोयर, अमन ढुमणे, विकी पिंपळे, प्रशिल चरडे, भूषण जगताप, रामदास डुकरे सर, राजदत्त रणवरे, मनोज जगताप, राजेंद्र सूर्यवंशी, भरत मुडे, गजानन पुरणकर, आदित्य लोहारे, सुरज कुदेवाल, राकेश टागोर, राज दांदडे, अविनाश मेश्राम, वैभव मडावी, अनिल पुरी, विक्की गावंडे, प्रज्वल देवडे, धनंजय इटाळे, विजय तळवेकर, प्रभाकर भुसे, पवन राऊत, मनोज इवनाथे, दिनेश वंजारी, गजानन महाजन आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post Views: 421
Previous Post

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गुलाबपुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल” म्हणून पुरस्कार

Next Post
जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल” म्हणून पुरस्कार

जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा "उत्कृष्ट कोतवाल" म्हणून पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us