Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

श्याम आजच्या विद्यार्थ्यांचा आदर्श असावा – वत्सला चौधरी

'श्यामची आईं' पुस्तक विद्यार्थ्यांना भेट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 29, 2024
in चोपडा, शैक्षणिक
0
श्याम आजच्या विद्यार्थ्यांचा आदर्श असावा – वत्सला चौधरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 29 – बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या मनाची पकड मोबाईल आणि समाज माध्यमांनी घेतली आहे. त्यातून समोर येणाऱ्या माहितीनुसारच त्यांची मने घडत आहे. परंतु देश आणि समाजाच्या भल्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी श्याम समजून घेतला पाहिजे व तोच श्याम त्यांचा आदर्श असावा. आताच्या पिढीला श्याम आणि त्याची आई समजण्यासाठी प्रत्येक शाळेने ‘श्यामची आई’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला दिले पाहिजे, असे प्रतिपादन धुळे येथील जयहिंद कॉलेजच्या निवृत्त उपप्राचार्य वत्सला चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केले.
         साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती निमित्ताने येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी मंचावर चहार्डी येथील शा. शि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. सी. पाटील, आर्ष पब्लिकेशन पुणेचे प्रा. दिलीप चव्हाण, जळगाव येथील डॉ. सोनाली महाजन, कस्तुरबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नीलकंठ सोनवणे, महिला मंडळ शाळेचे संजय बारी, मामलदे विद्यालयाचे रोहिदास सोनवणे हे उपस्थित होते. ह्या प्रसंगी निवडक विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात १०० विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
          यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, श्यामला जगाने भित्रा म्हणू नये म्हणून आईने कठोर होत त्याला पोहायला शिकविले. मनाला घाण लागू नये म्हणून जपायला शिकवले. श्यामने मातृभूमी आणि आपल्या जन्मदात्री मातेच्या संस्कारांचा आयुष्यभर अनुनय केला. साने गुरुजींनी विद्यार्थी, शेतकरी, सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून लढा दिला. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे विचार वाचुन आत्मसात केले पाहिजे.
              कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी तर वक्त्यांचा परिचय मुख्याध्यापक नीलकंठ सोनवणे यांनी व सुत्रसंचलन विनोद पाटील यांनी केले. कस्तुरबा विद्यालयातील या कार्यक्रमास दोन्ही शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 304
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

सुदृढ आरोग्यासाठी क्रिडा व व्यायाम आवश्यक ना. डॉ. पंकज भोयर

Next Post
सुदृढ आरोग्यासाठी क्रिडा व व्यायाम आवश्यक ना. डॉ. पंकज भोयर

सुदृढ आरोग्यासाठी क्रिडा व व्यायाम आवश्यक ना. डॉ. पंकज भोयर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us