टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी आणि डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत विशेष यश संपादन केल्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी दिव्यतेज अतुल पाटील याची बेसबॉल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून एकूण १६ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात दिव्यतेज अतुल पाटील याचा देखील समावेश आहे.

इयत्ता सहावी आणि नववी साठी आयोजित करण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आराध्या चंद्रशेखर वानखेडे हिने ८२ गुण प्राप्त केले आहे. इयत्ता नववीतील विद्यार्थी दक्ष प्रवीण जयस्वाल याने देखील डाॕ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत ७० गुण प्राप्त केले असून हे दोन्ही विद्यार्थी द्वितीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी या विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, शाळा समन्वयक प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, अश्विनी पाटील देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका विशाखा बडगुजर यांनी केले.

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.








