Friday, September 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

२७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार पुरस्कार वितरण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
in चोपडा, वैशिष्ट्यपूर्ण
0
अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच एकूणच अस्सलता व परिणामकारकता या निकषांवर खरा उतरलेल्या चोपडा येथील ज्येष्ठ कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाला नाशिक येथील ‘मातोश्री स्व. दगूबाई बापूराव उगले पहिला स्मृती काव्य पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.

येत्या २७ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे सकाळी ११.३० वाजता ह. भ. प. बापूराव महाराज उगले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक येथील कवी राजेंद्र उगले तथा राऊ यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यभरातील ४४ कवींच्या काव्यसंग्रहांमधून साहित्यिक विवेक चिंतामण उगलमुगले आणि जयश्री अनिलराव वाघ यांनी अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

यापूर्वी या काव्यसंग्रहाला डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाचा ‘अनिल साठ्ये पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. अशोक सोनवणे यांची ही १४ वी साहित्यकृती असून, हा त्यांचा चौथा प्रौढ काव्यसंग्रह आहे.

अशोक सोनवणे हे चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे अशोक सोनवणे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव झाला असून, या निमित्ताने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post Views: 114
Previous Post

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

by टीम लोकप्रवाह
August 27, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच ग्रामीण विकासाला शैक्षणिक संस्थेची साथ...

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात चोपडा शहरातील आदिवासी...

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात...

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

by टीम लोकप्रवाह
August 24, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २४ ऑगस्ट २०२६ शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवार, दि....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us