Thursday, August 27, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

३१ ऑगस्ट अंतिम मुदत; ई-केवायसी न केल्यास अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गमावण्याची शक्यता

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
in चोपडा, शासकीय
0
चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात तब्बल ४२ हजार ५६७ लाभार्थी सदस्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. चोपडा तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेतील १ लाख ८२ हजार ५८८, तर अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत ४० हजार ८०२ सदस्य आहेत. या दोन्ही योजनांतील एकूण २ लाख २३ हजार ३९० लाभार्थी सदस्यांपैकी ४२ हजार ५६७ सदस्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.

मुदतीनंतर नावे वगळली जाऊ शकतात

३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी सदस्यांना शासनाच्या नियमानुसार अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र मानले जाऊ शकते. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

शासकीय कर्मचारी व जास्त उत्पन्न असलेल्यांचीही पडताळणी

दरम्यान, सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांमध्ये शासकीय नोकरी करणारे, शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले तसेच कंपनीधारक किंवा पात्रता निकषात न बसणारे लाभार्थी यांचीही पात्रता पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित लाभार्थ्यांनी आपली माहिती व पात्रता ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पडताळून घ्यावी. शासनाच्या निकषांनुसार अपात्र आढळणाऱ्या लाभार्थ्यांची नावे अन्नसुरक्षा योजनेच्या यादीतून नियमानुसार वगळण्यात येणार आहेत.

घरबसल्या ‘मेरा eKYC’ ॲपद्वारेही सुविधा

लाभार्थ्यांना संबंधित रास्त भाव दुकानातील e-POS मशीनद्वारे ई-केवायसी करता येणार आहे. तसेच ‘मेरा eKYC’ ॲप डाउनलोड करून घरबसल्या विहित मुदतीत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

ई-केवायसी किंवा पात्रता पडताळणीसाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटकडे कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रास्त भाव दुकानदारांनीही आपल्या दुकानाशी संलग्न असलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना याबाबत माहिती देऊन ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Post Views: 237
Previous Post

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

Next Post

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

Next Post
चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात चोपडा शहरातील आदिवासी...

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात...

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

by टीम लोकप्रवाह
August 24, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २४ ऑगस्ट २०२६ शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवार, दि....

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

by टीम लोकप्रवाह
August 21, 2026
0

चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही...

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

by टीम लोकप्रवाह
August 18, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 18 : चोपडा शहर पोलीस ठाणे येथे ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक...

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

by टीम लोकप्रवाह
August 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी जळगाव पूर्व विभागाची आढावा...

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

by टीम लोकप्रवाह
August 16, 2026
0

चोपडा, दि. १५ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ, मालेगाव यांच्या वतीने चोपडा येथील...

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

by टीम लोकप्रवाह
August 15, 2026
0

चोपडा, दि. १५ ऑगस्ट २०२६ : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयात...

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

by टीम लोकप्रवाह
August 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : देशभरात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याच...

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

by टीम लोकप्रवाह
August 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 : बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित येथे श्रावण मासानिमित्त आज, दि....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us