Thursday, September 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

‘एक वीट माझी’ संस्थेच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप; CPL-3 मधून डायलिसिस सेंटरमधील गरजू रुग्णांसाठी दीड लाखांची मदत

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
in चोपडा, खेळ, सामाजिक
0
खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘चोपडा प्रीमियर लीग (CPL-3)’ या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ‘Play for a Cause — खेळासाठी… समाजासाठी…’ हा सामाजिक संदेश देत स्पर्धेतून संकलित निधीचा उपयोग गरजूंसाठी करण्यात आला.

CPL-3 मधून संकलित निधीतून हरताळकर हॉस्पिटल, चोपडा येथील डायलिसिस सेंटरमधील गरीब व गरजू रुग्णांच्या मोफत उपचारासाठी ₹१.५० लाखांचा निधी सुपूर्द करण्यात आला. तसेच उर्वरित निधीतून चोपडा तालुक्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमासाठी ‘एक वीट माझी’ सामाजिक संस्थेचे संचालक गौरव महाले यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला हातभार लागला. याबद्दल जयहिंद क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा शहर पोलीस निरीक्षक  पवन देसले होते. प्रमुख अतिथी म्हणून ‘एक वीट माझी’ सामाजिक संस्थेचे संचालक गौरव महाले, साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन काटे तसेच न्यू बापू टी हाऊसचे संचालक राहुल महाजन उपस्थित होते.

यावेळी जयहिंद क्रिकेट क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर साखरे, उपाध्यक्ष मनोहर पाटील, सचिव रुपेश पाटील यांच्यासह क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर देशमुख सर यांनी केले. प्रास्ताविक रुपेश पाटील यांनी केले, तर आभार गोपाल शिंपी यांनी मानले.

Post Views: 189
Previous Post

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

Next Post

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

by टीम लोकप्रवाह
August 27, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच ग्रामीण विकासाला शैक्षणिक संस्थेची साथ...

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात चोपडा शहरातील आदिवासी...

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात...

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

by टीम लोकप्रवाह
August 24, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २४ ऑगस्ट २०२६ शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवार, दि....

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

by टीम लोकप्रवाह
August 21, 2026
0

चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही...

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

by टीम लोकप्रवाह
August 18, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 18 : चोपडा शहर पोलीस ठाणे येथे ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक...

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

by टीम लोकप्रवाह
August 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी जळगाव पूर्व विभागाची आढावा...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us