चोसाकाचे दोन ते अडीच कोटीचे भंगार झाले गायब; तज्ञ संचालक बाळासाहेब पाटील यांचा पत्रकार परिषदेतून बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर आरोप !!
लोकप्रवाह, चोपडा दि. १० – तालुक्यातील चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना बारामती अॕग्रोला भाडेतत्त्वावर देण्याआधी त्या कारखान्यात जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे भंगार साहित्य होते, परंतु सर्व भंगार साहित्य हे आता गायब झाले असून, ते साहित्य सुरुवातीला बारामती ॲग्रो ने वापरले होते. मात्र चेअरमन अतुल ठाकरे यांनी त्याबाबतचा हिशोब संचालक मंडळासमोर दिलेला नाही. तसेच वर्डी येथील स्टोअर मधील कर्मचारी शेखर पाटील गेल्या पंधरा वर्षापासून स्टोअर मध्ये कामाला होते. कारखाना सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस त्यांनी काम केले, त्यांच्या हातून पन्नास लाखाचे साहित्य बारामती अॕग्रोला पुरवले होते. ते कर्मचारी प्रामाणिक होते म्हणून त्यांना कामावरून कमी केले. त्या ठिकाणी अनुभव नसलेले कर्मचारी भरले गेले. जेणेकरून भंगार साहित्यामध्ये भ्रष्टाचार करता येईल, असा कर्मचारी भरला गेला. त्यानंतर जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे भंगार लंपास करण्यात आलेले आहे.
तसेच कारखान्यामध्ये मोलायसिस च्या दोन टाक्यांमध्ये जवळपास 1000 ते 1200 टन मोलायसीस शिल्लक होते. त्याचा बाजारभाव अंदाजे पाच ते सहा हजार रुपये प्रति टन एवढा होता. त्याचाही हिशोब संचालक मंडळासमोर आलेला नाही. त्याची विल्हेवाट कशी व कुठे लागली? याबाबतही चौकशी होण्यासाठी तज्ञ संचालक बाळासाहेब उर्फ विजय दत्तात्रय पाटील यांनी साखर आयुक्तांकडे जवळपास 26 मुद्दे नोंदवून लेखी तक्रार केलेली आहे. तोच तक्रारी अर्ज जिल्हा निबंधक आणि तहसीलदार अनिल गावित यांच्याकडेही त्यांनी तक्रार म्हणून दिलेला आहे. कारखान्यांमध्ये अंदाधुंद कारभार चालतो. या नोंदवलेल्या सगळ्या मुद्द्यांची मुद्देनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
कारखाना सुरू होण्याअगोदर त्यांनी शंभर टन भंगार, दोन ट्रकभर रबरी टायर त्यामध्ये कारखान्याचे बैलगाडी तोडून भंगार हे विक्री करण्याची निविदा प्रक्रिया न करता विकले. रबराचे भाव कोरोना काळात जास्त असताना कमी भावात विक्री झाली असे दाखवले, तसेच साखर कारखान्याचा पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये अंदाजे पाच हजार लिटरपेक्षा जास्त डिझेल शिल्लक होते. त्याचाही हिशोब नाही. पेट्रोल पंप बारामती ॲग्रोला देताना त्या डिझेलचे काय झाले?, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांच्याकडे जवळपास साडे चार कोटीच्या वर रक्कम घेणे आहे त्यांचे दावे न्यायालयामध्ये सुरू आहेत व काही दाव्यांची तडजोड झाली आहे. तडजोडमार्फत किती पैसे कारखान्याकडे जमा झाले आहेत, त्याचा खर्च कसा केला याचा हिशोबही अजून दिलेला नाही. कारखाना बंद पडण्या अगोदर शेतकऱ्यांकडेही ऊस बेणे पेमेंट अडीच ते तीन कोटी रुपये घेणे होते. यापैकी चेअरमन अतुल ठाकरे यांनी बऱ्यापैकी पैसे वसूल केले असून त्याचा हिशोब दिलेला नाही. यासह इतर अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत. याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे .
एकूण 26 मुद्द्यांचा तक्रारी अर्ज जिल्हा निबंधक यांच्याकडे चौकशीसाठी देण्यात आलेला आहे. सदर तक्रार अर्जाची प्रत महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, किरीट सोमय्या, सहकार आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त साखर विभाग औरंगाबाद, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडेही देण्यात आलेली असल्याचे पत्रकार परिषदेतून विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...