Monday, July 27, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 16, 2022
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
मारुती ओमनी व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जखमी !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – येथील धरणगांव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ चोपडयाहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती ओमनी व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत मोटरसायकलवर प्रवास करणारे चोपड्यातील दोघे जागीच ठार झाले तर मारुती ओमनीतील सहा जण जखमी झाल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. यात जखमी असलेल्यांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघांना धुळे व जळगांव येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त मोटरसायकल
    याबाबत सविस्त वृत्त असे की, वाडीभोकर ता.जि. धुळे येथील सहा जण मारुती ओमनी क्रमांक MH 18 W 7987  मधून चोपड्याकडून धुळ्याकडे जात असतांना चोपडा – धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ धरणगाव कडून चोपड्याकडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH 19 CL 7241 यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चोपडा शहरातील अफसर इरफान काझी वय – 48 वर्षे रा. दर्गाह अळी, चोपडा व शेख अनिस शेख जहुर वय – 46 वर्षे रा. धरणगांव ह.मु. मणियार अळी, चोपडा यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारुती ओमनीतील अविनाश बोरसे, आकाश साळवे, सागर पानपाटील, वाहन चालक अजय मोरे, राहुल घोडे, दीपक धनले सर्व रा. वाडीभोकर, धुळे हे जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच  चोसाकाचे व्हा चेअरमन शशिकांत देवरे,माजी नगरसेवक हुसेन पठाण,वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर डॉ. नरेंद्र पाटील व डॉ. सुरेश पाटील यांनी जखमींवर उपचार केले. या अपघातात जखमी झालेले वाहनचालक अजय मगन मोरे याच्या डोळ्याला जबर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्वरीत धुळे येथे हलविण्यात आले.
अपघातग्रस्त चारचाकी मारुती ओमनी
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट घेत अपघाताची माहिती घेतली. तसेच सहा.पोलीस निरिक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोना.संतोष पारधी, शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, वेलचंद पवार, मधुकर पवार, सुमेरसिंग वाघेर आदिंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व जखमींना मदत करणाऱ्या लोकांनी मृत व जख्मी यांची कागदपत्रे बघून ओळख पटवली. सदर अपघाताबाबत अक्समात मृत्यू म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Post Views: 533
Previous Post

चार गावठी कट्टयांसह श्रीरामपूरचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; एलसीबीची कारवाई !

Next Post

महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

Next Post
महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us