Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम

तेलंगणाचे अर्थमंत्री ना. हरीश राव यांचेहस्ते बीआरएस मध्ये प्रवेश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2023
in ब्रेकींग न्युज, राजकीय
0
माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते, गोरगावलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात अर्थ व आरोग्यमंत्री  हरीश राव, अन्नपुरवठा मंत्री रवींदरसिंग यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे पाटील, नाशिक विभागप्रमुख नानासाहेब बच्छाव, धुळे-नंदुरबारचे समन्वयक ॲड. अविनाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बाविस्कर यांनी हरिश राव यांचा खान्देशी टोपी, शाल व गुच्छ देऊन सत्कार केला. लवकरच त्यांना पुढिल  बैठकीसाठी हैद्राबाद येथे बोलाविण्यात येणार आहे, अशी माहिती जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.
        मागील २५ ते ३० वर्षांपासून जगन्नाथ बाविस्कर यांनी भाजप सेनेला कोळी समाजाची खंबीर साथ देतांना वेळोवेळी युतीचे नेते, आमदार, खासदार, मंत्री यांना कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विनवण्याही केलेल्या आहेत. परंतु युती व आघाडी तसेच सध्याची तिघाडी यांनी कोळी समाजाच्या तोंडाला नुसती पाने पुसली आहेत. जगन्नाथ बाविस्कर यांनी मे महिन्यात कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत यासाठी अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों दाखले मिळवुन दिले होते. त्यावेळेसही सत्ताधारी युतीच्या नेत्यांना निवेदने दिलेली असतांना त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. आपण तन-मन-धन लावून पक्षवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना आपल्या समाजाला न्याय मिळत नसेल तर असे पक्ष व नेत्यांसोबत राहायचेच कशाला ? म्हणूनच त्यांनी आपल्या परिवारातील सदस्य, नातेवाईक, कोळी समाजबांधव, सर्व जातीधर्मातील स्नेहीप्रेमी व सहकारी मित्रमंडळी यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेऊन भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश घेतला असल्याचे बाविस्कर यांनी सांगीतले आहे.
        याप्रसंगी जळगावचे समन्वयक देवेंद्र वराडे, धुळ्याचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील, चोपड्याचे समन्वयक समाधान बाविस्कर, शिंदखेड्याचे विठ्ठल नगराळे, शिरपूरचे ओंकारराव जाधव, नारायण पवार, विनोद पाटील, जामनेरचे विनोद तवर यांची विशेष उपस्थिती होती. चोपडा अध्यक्ष दीपक पाटील, महिला अध्यक्ष कोमल पाटील, युवाध्यक्ष अनिल कोळी व बीआरएसचे सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 विठ्ठला….. कोणता झेंडा घेऊ हाती ?
          शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व पाणी देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री व बीआरएसचे राष्ट्रिय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आषाढीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठू माऊलींच्या चरणी आपल्या जनतेसाठी प्रार्थना केली आहे. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडीची बिघाडी झाल्याने जनता जनार्दन यांच्या मूळ प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे अक्षम्यं दुर्लक्ष झालेले आहे. यांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे ? असे असतांना केसीआर महाराष्ट्राला विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणूनच मी भाजपाचा राजीनामा देऊन विठ्ठलसाक्षी बीआरएसचा झेंडा हाती घेतलेला आहे. मी आपणांसर्वांना बीआरएसच्या फ्रंटलाईन मध्ये येण्याचे आवाहन करित आहे..
            जगन्नाथ बाविस्कर
         सदस्य, भारत राष्ट्र समिती 
          चोपडा
Post Views: 673
Previous Post

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दशरथ चव्हाण

Next Post

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड

Next Post
चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us